AMC : अहिल्यानगर महापालिका क्षेत्राचा नवीन विकास आराखडा तयार!

AMC : अहिल्यानगर महापालिका क्षेत्राचा नवीन विकास आराखडा तयार!

0
AMC : अहिल्यानगर महापालिका क्षेत्राचा नवीन विकास आराखडा तयार!
AMC : अहिल्यानगर महापालिका क्षेत्राचा नवीन विकास आराखडा तयार!

AMC : नगर : अहिल्यानगर महापालिका (AMC) क्षेत्राचा सुधारीत विकास आराखडा (Revised Development Plan) तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने नियुक्त केलेल्या नगररचना विभागाच्या पथकाने (डीपी युनिट) मूळ हद्द व वाढीव हद्दीचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केला आहे. 

अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर

महापालिका क्षेत्राच्या मूळ हद्दीची विकास

विद्यमान जमीन वापर नकाशामध्ये काही सुधारणा किंवा त्रुटी असल्याबाबत, नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यास प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार करताना योग्य ती दखल घेण्यात येईल. त्यासाठी, नागरिकांनी किंवा संबंधित व्यक्तीनी कार्यालयास कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमान्वये अहिल्यानगर महापालिका क्षेत्राच्या मूळ हद्दीची विकास योजना अधिसूचना ४ जुलै २००५ अन्वये मंजूर आहे. तर, वाढीव हद्दीची विकास योजना अधिसूचना ४ एप्रिल २०१२ अन्वये मंजूर आहे. या विकास योजना सुधारित करण्यासाठी अहिल्यानगर महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम कलम चे कलमान्वये सर्वसाधारण सभेचा ठराव करून ७ मार्च २०२४ रोजी जाहीर केलेला आहे.

नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

शासनाच्या नगररचना विभागाचे पथक नियुक्त (AMC)

राज्य शासनाने नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या नगररचना विभागाचे पथक नियुक्त केले आहे. त्यांनी तयार केलेला विद्यमान जमीन वापर नकाशा व अहवाल, नगर रचना अधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट रोजी महापालिकेस हस्तांतरित करण्यात आला आहे. हा नकाशा नागरिकांना पाहण्याकरिता महापलिका व विकास योजना विशेष घटक कार्यालयात, कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. तसेच सदर नकाशा महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यमान जमीन वापर नकाशामध्ये काही सुधारणा किंवा त्रुटी असल्यास नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यास प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार करताना योग्य ती दखल घेण्यात येईल. त्यासाठी, नागरिकांनी किंवा संबंधित व्यक्तीनी कार्यालयास कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.