AMC : … तर आज प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार!

AMC : … तर आज प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार!

0
AMC : … तर आज प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार!
AMC : … तर आज प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार!

AMC : नगर : महापालिकेच्या (AMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या (General Elections) पार्श्वभूमीवर सतरा प्रभागांच्या रचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मान्यता दिल्यास आज (ता. ३) सायंकाळपर्यंत जाहीर होणार आहे. प्रारूप प्रभागरचना (Ward Structure) जाहीर करण्यासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. सन २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभागाची सुमारे २० हजार अशी सरासरी लोकसंख्या निश्चित करून प्रभाग करण्यात आले आहेत.

नक्की वाचा: मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!

काही प्रभागांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल (AMC)

दरम्यान, काही प्रभागांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याची चर्चा असून, त्यामुळे नवीन रचनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिकेने प्रारूप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. तेथून तो नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला. २५ ऑगस्टपर्यंत आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आयोगाकडून आराखड्याला मान्यता मिळाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यावर ९ ते १८ सप्टेंबरदरम्यान हरकती दाखल करता येणार आहेत.