AMC : नगर : अहिल्यानगर शहरात अमृत अभियाना अंतर्गत १२७ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेली कामे अहिल्यानगर महापालिकाच (AMC) उध्वस्त करत आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निवेदन पाठवले आहे.
अवश्य वाचा : दारुबंदीसाठी महिलांचा रुद्रावतार; पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा
निवेदनात म्हटले आहे की,
अहिल्यानगर शहरात ड्रेनेज लाईन व्यवस्थित करण्याकरिता तसेच अहिल्यानगर शहरातील ड्रेनेज लाईनचे पाणी हे सीना नदीत सोडल्यामुळे सीना नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत होते त्यामुळे राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशाने प्रदूषण कमी करण्याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याकरिता व शहरातील ड्रेनेजची समस्या सोडविण्याकरिता १२७ कोटी रुपयांचा निधी अहिल्यानगर महापालिकेला देण्यात आला होता. त्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवून ३० जून २०१८ रोजी ड्रीम कंट्रक्शन नंदुरबार या कंपनीला कार्यारंभ आदेश देऊन काम शहरातील अनेक भागांमध्ये सुरू करण्यात आले होते. हे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. या कामांमध्ये हे संपूर्ण ड्रेनेजचे पाणी शहरातून नदी मार्गे भुयारी गटार टाकून फरियाबाग येथील शुद्धीकरण प्रकल्प येथे जमा करून व पाण्याचे शुद्धीकरण करून शेतीला पूरक असे पाणी देण्यात येणार आहे अशी ही योजना आहे.
नक्की वाचा: शेंडी येथील मोटर्स शोरुम फोडून चोरी करणारे गजाआड
भुयारी गटार काढून पुन्हा ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम (AMC)
परंतु भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून झालेली कामे ही आज काढून टाकण्याचा प्रकार महानगरपालिकेचे अधिकारी व काही काँक्रिटीकरण रस्त्यांचे काम सुरू असलेले ठेकेदार हे करत आहेत त्यामध्ये राज्य सरकारच्या नगर उत्थान अंतर्गत १५० कोटी रुपयांची कामे नगर शहरांमध्ये सुरू आहेत. तसेच नागरी क्षेत्र वस्ती ४० कोटी रुपयांच्या निधीतील रस्ते काँक्रिटीकरणांचे कामे सुद्धा सुरू आहेत त्याच मार्गांवर पहिले भुयारी गटाचे काम करण्यात आलेले होते परंतु या अनेक मार्गांवर भुयारी गटार काढून टाकून पुन्हा नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम या संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आल्याचे दिसून येते आहे त्यामुळे भुयारी गटाचे १२७ कोटी रुपये वाया जाण्याचा प्रकार महापालिकेकडून होत आहे, असा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे.
भुयारी गटार काढून टाकून दोन वर्षाच्या आतच पुन्हा नवीन ड्रेनेज लाईन गटारीचे काम महानगरपालिकेने केलेले आहे यामध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार या दोघांनी मिळून हा घोटाळा सुरू ठेवलेला आहे. यांच्यामुळेच शासनाचे १२७ कोटी रुपये वाया जात आहे, असे नितीन भुतारे यांनी सांगितले.



