AMC : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (AMC) वतीने शहरामध्ये डेंगूमुक्त (Dengue) अभियान सुरू असून १४ आठवड्यांमध्ये १५,४१८ घरांची तपासणी केली आहे. तसेच ४०,९२७ पाणी साठे तपासले आहेत. यामध्ये ६३७ पाणी साठ्यामध्ये अळ्या आढळल्या असून ते पाणी (Water) साठे नष्ट करण्यात आले आहेत.
नक्की वाचा: नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन
नागरिकांच्या आरोग्याची केली तपासणी
या परिसरामध्ये औषध फवारणी व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली आहे. मागील वर्षी सप्टेंबरपर्यंत ५४ डेंगूचे रुग्ण शहरामध्ये आढळले होते. यावर्षी १० रुग्ण आढळले असून डेंगूमुक्त अभियान नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचले असल्यामुळे जनजागृती झाली आहे. त्यामुळे डेंगूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
अवश्य वाचा: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवणार: खासदार लंके
विद्यार्थ्यांनी पुढे येऊन स्वच्छता दूत म्हणून काम करावे (AMC)
भविष्यात डेंगूमुक्त अहिल्यानगर निर्माण करायचे आहे. शहरातील विद्यार्थ्यांनी पुढे येऊन स्वच्छता दूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिका व स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या वतीने दातरंगे मळा परिसरात डेंगूमुक्त अभियान संपन्न झाले असून आयुक्त यशवंत डांगे यांनी पाणी साठ्याची तपासणी केली.
यावेळी उपयुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे, माजी नगरसेवक सचिन शिंदे, श्यामआप्पा नळकांडे, प्रा. अरविंद शिंदे, संदीप दातरंगे, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. दिलीप बागल, डॉ. सृष्टी बनसोडे, डॉ. ऐश्वर्या दळवी, मुख्याध्यापिका वसुधा जोशी, शारदा हौसिंग, शपाकत सय्यद यांच्यासह डॉक्टर, नर्स, आशा सेविका, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्यामआप्पा नळकांडे म्हणाले की, डेंगूचा छोटासा डास मनुष्याला मृत्यूपर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी पाणी साठे तपासावेत तसेच साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. नागरिकांनी आठवड्यातून १ दिवस स्वच्छता मोहीम राबवून आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. आयुक्त यशवंत डांगे यांनी सुरू केलेले डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियान कौतुकास्पद असून यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे, असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सृष्टी बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी मानले.