दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि महानगरपालिकेकडून प्रदर्शनाचे आयोजन
AMC : नगर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार (Government of India)) आणि अहिल्यानगर महानगरपालिका (AMC) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान महावीर कलादालन येथे हे प्रदर्शन होणार असून, यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि महाकुंभाच्या निमित्ताने विविध कलाकारांनी साकारलेली चित्रे सादर होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
अवश्य वाचा : मोहटादेवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
महाकुंभाची परंपरा चित्रांच्या माध्यमातून अधोरेखित
प्रदर्शनाचा शुभारंभ २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते व उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी विविध कलाकारांनी साकारलेली चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. देवी अहिल्याबाईंचे परोपकारी जीवन, समाजसुधारक कार्य आणि महाकुंभाची वैभवशाली परंपरा चित्रांच्या माध्यमातून अधोरेखित केली जाणार असल्याचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांनी सांगितले.
नक्की वाचा : पूर परिस्थिती भागात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून द्या: पालकमंत्र्यांच्या सूचना
प्रवेश विनामूल्य (AMC)
महावीर कलादालन येथे सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. प्रवेश विनामूल्य आहे. “आलेख्य” या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय कला, संस्कृती आणि इतिहास जवळून जाणून घेण्याची आणि अनुभवण्याची एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे. नगरकरांनी या संधीचा लाभ घेऊन प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.