AMC : कचरा उचलण्यासाठी नागरिकाने घेतला स्वतःचा ट्रॅक्टर!; महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

AMC : कचरा उचलण्यासाठी नागरिकाने घेतला स्वतःचा ट्रॅक्टर!; महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

0
AMC : कचरा उचलण्यासाठी नागरिकाने घेतला स्वतःचा ट्रॅक्टर!; महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
AMC : कचरा उचलण्यासाठी नागरिकाने घेतला स्वतःचा ट्रॅक्टर!; महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

AMC : नगर : महापालिकेच्या (AMC) निष्क्रियतेचा व स्वच्छता विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. वारंवार प्रशासनाकडे कचरा उचलण्याबाबत तक्रार करून त्याकडे महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) दुर्लक्ष केले आहे. तक्रार करूनही ती सुटत नसल्याने एका तरुणाने बारा लाख रुपये खर्च करून स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन परिसरातील कचरा (Garbage) उचलण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. महापालिका ‘स्वच्छ शहर’चे दावे करत असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना स्वतःच स्वच्छतेची जबाबदारी उचलावी लागत आहे. कर भरूनही सेवा न मिळत ही नागरिकांची दुहेरी शिक्षा ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही प्रतिसाद नाही

सावेडी उपनगरातील हनुमान नगर येथील रहिवासी राजेश सुखदेव पवार यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कचरा उचलला गेला नाही. म्हणून बारा लाख रुपये खर्च करून स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन परिसरातील कचरा उचलण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. “आमच्या घराच्या आवारात मोठमोठी झाडं आहेत. दर दोन महिन्यांनी झाडांचा पालापाचोळा, फांद्या आणि नारळाच्या शेंडी कापावी लागते. पण दर चार दिवसांनी येणारी घंटागाडी हा कचरा घेऊन जात नाही. महापालिकेकडे झाडांचा पालापाचोळा उचलण्यासाठी स्वतंत्र गाड्या आहेत, पण त्या इथे कधीच येत नाहीत. कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही.”

नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर

आम्ही कचरा उचलायचा मग महापालिकेचं नेमके काम काय? (AMC)

“पूर्वी आम्ही पैसे देऊन खासगी वाहनातून हा कचरा उचलून टाकत होतो. पण हे वारंवार घडू लागल्याने आता आम्हालाच नवीन ट्रॅक्टर ट्रॉली घ्यावी लागली. कर वेळेवर भरतो, तरीही आम्हालाच हा खर्च करावा लागतो हे प्रशासनाचं अपयश आहे,” असं पवार म्हटले आहे. हनुमान नगर परिसरातील इतर नागरिकांनीही अशाच तक्रारी केल्या आहेत. “झाडांच्या फांद्या, मोठा कचरा किंवा बांधकामातील अवशेष उचलण्यासाठी महापालिकेच्या गाड्या कधीच दिसत नाहीत. परिसरातील कचरा वाढत असल्याने आरोग्य धोक्यात आलं आहे”. आम्ही ट्रॅक्टर घ्यायचा, कचरा उचलायचा आणि भरायचा… मग महापालिकेचं नेमकी काम काय?” असा प्रश्न ही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.