AMC : नगर शहरात होणार ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान; महापालिकेतर्फे आयोजन

AMC : नगर शहरात होणार 'स्वच्छता ही सेवा' अभियान; महापालिकेतर्फे आयोजन

0
AMC : नगर शहरात होणार 'स्वच्छता ही सेवा' अभियान; महापालिकेतर्फे आयोजन
AMC : नगर शहरात होणार 'स्वच्छता ही सेवा' अभियान; महापालिकेतर्फे आयोजन

AMC : नगर : केंद्र सरकारच्या (Central Govt) निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा जयंतीदिन स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत महापालिकेतर्फे (AMC) १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता मोहीम, जनजागृतीपर कार्यक्रम,शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता, निबंध, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धा, सफाई मित्र सुरक्षा शिबिर, वृक्षारोपण, सायकल स्पर्धा, प्लॉगीथॉन, सफाई कामगारांचस सन्मान अशा विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली आहे.

नक्की वाचा: आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार

अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ

या अभियानाचे उद्घाटन न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (ता. १८) होणार आहे. दुनियादारी फेम अभिनेत्री उर्मिला कानेटकर, आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा मराठा प्रसारक संस्थेचे विश्वस्त रामचंद्र दरे, ॲड.विश्वास आठरे, न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब सागडे व रेसिडेन्सीअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्वच्छतेवरील जिंगलचे अनावरण होणार आहे कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी स्वच्छ्ता जनजगृती पर पथनाट्य व ‘एक पेड मा के नाम’ उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमात शहरातील नागरिक, शाळा, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महापालिका कर्मचारी सहभागी होणार आहेत.

अवश्य वाचा: येथील मुस्लिम कुटुंबांकडून केली जाते गौराईची स्थापना

दररोज स्वच्छता मोहीम (AMC)

दररोज स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता या अभियानात केली जाणार आहे. तसेच, स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सायकल स्पर्धा, प्लॉगीथॉन असे उपक्रम राबविले जाणार आहेत. नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. वेस्ट टू आर्ट अंतर्गत महालक्ष्मी उद्यानात उपक्रम राबवून टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती केली जाणार आहे.

विविध स्पर्धांचे आयोजन
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता, निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिली ते चौथी (छोटा गट), पाचवी ते आठवी (मध्यम गट), नववी – दहावी (मोठा गट) अशा तीन गटात या स्पर्धा होणार आहेत. यात प्रथम क्रमांक तीन हजार रुपये, द्वितीय क्रमांक अडीच हजार रुपये, तृतीय क्रमांक दीड हजार रुपये व उत्तेजनार्थ एक हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सहभागी होण्याचे आवाहन
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी महात्मा गांधी पुतळा वाडिया पार्क येथे पुष्पहार अर्पण करून नगर महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात अभियानाची सांगता होणार आहे. यात विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व सफाई कामगारांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे. शहरातील सर्व नगरकर, सामाजिक संघटनांनी या अभियानात सहभागी व्हावे तसेच अभियानाबाबत नागरिकांच्या काही सूचना किंवा संकल्पना असतील तर या बाबत मा.आयुक्त यांच्याशी कार्यालयात भेट घेऊन संवाद साधावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे

स्वच्‍छता मोहीम (ता. १९ सप्टेंबर)
ठिकाण – विशाल गणपती मंदिर परिसर
सहभागी – विश्वस्त मंडळ, श्रीकांत प्रेमराज गुगळे माध्यमिक विद्यालय, सीएसआरडी विद्यार्थी मनपा प्र.स.क.२ चे कर्मचारी

स्वच्‍छता मोहीम (ता. २० सप्टेंबर)
ठिकाण – पुणे बस स्‍थानक परिसर
सहभागी – राजयोग प्रतिष्‍ठान, नागरिक, भाऊसाहेब फिरोदिया माध्‍यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, केडगाव उपकार्यालय सर्व महापालिका कर्मचारी

आरआरआर सेंटर भेट (ता. २० सप्टेंबर)
ठिकाण –  मेंटॉर्स फाउंडेशन
सहभागी –  मेंटॉर्स फाउंडेशन सदस्य

स्वच्‍छता मोहीम (ता. २१ सप्टेंबर)
ठिकाण – माळीवाडा बस स्‍थानक परिसर  
सहभागी – महिला बचत गट, सिताराम सारडा माध्‍यमिक विद्यालयाचे विदयार्थी, महापालिका कर्मचारी लेखा विभाग, लेखापरीक्षण विभाग

स्वच्‍छता मोहीम (ता. २२ सप्टेंबर)
ठिकाण – अमरधाम परिसर व बाळजी बुवा बारव
सहभागी – धर्मवीर प्रतिष्‍ठाण, महिला बचत गट, केशवराव गाडीलकर माध्‍यमिक विद्यालयाचे विदयार्थी, महापालिका कर्मचारी बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग

सायकल स्‍पर्धा (ता. २२ सप्टेंबर)
ठिकाण – सावेडी उपनगर
सहभागी – अहमदनगर सायकल असोसिएशन

स्वच्‍छता मोहीम (ता. २३ सप्टेंबर)
ठिकाण – भिस्‍तबाग महाल परिसर
सहभागी – आठरे पाटील पब्‍लिक स्‍कूल व ज्ञानसंपदा शाळा, डॉ. ना.ज.पाऊलबुध्‍दे माध्‍यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, माजी नगरसेवक संपत बारस्‍कर, बचत गट, महापालिका कर्मचारी प्र.स.का.१

स्वच्‍छता मोहीम (ता. २४ सप्टेंबर)
ठिकाण – तारकपूर बस स्‍थानक परिसर
सहभागी – रेणावीकर माध्‍यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, महिला बचत गट, महापालिका कर्मचारी आस्‍थापना विभाग, सामान्‍य प्रशासन विभाग

स्वच्‍छता मोहीम (ता. २५ सप्टेंबर)
ठिकाण – रेल्‍वे स्‍थानक परिसर
सहभागी – महाराणी ताराबाई कन्‍या विद्यालयाचे विदयार्थी सी.एस.आर.डी. महाविद्यालयाचे विद्यार्थी, महिला बचत गट, महापालिका कर्मचारी प्रभाग समिती कार्यालय क्र.४

स्वच्‍छता मोहीम (ता. २६ सप्टेंबर)
ठिकाण – आनंद धाम परिसर
सहभागी – माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक शीतल जगताप, मिना चोपडा, प्रकाश भागानगरे, जिजामाता माध्‍यमिक विद्यालय सीएसआरडी महाविद्यालयाचे विद्यार्थी महिला बचत गट, महापालिका कर्मचारी घनकचरा व मोटर व्हिएकल विभाग

स्वच्‍छता संवाद (ता. २६ सप्टेंबर)
ठिकाण – प्रोफेसर चौक  
सहभागी – मैत्री कट्टा संजय दळवी

स्वच्‍छता मोहीम (ता. २७ सप्टेंबर)
ठिकाण – गंगा उद्यान
सहभागी – माजी नगरसेवक अजिंक्‍य बोरकर, महिला बचत गट, आनंद माध्‍यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी, महापालिका कर्मचारी उद्यान  व प्रसिध्दी विभाग सर्व कर्मचारी

स्वच्‍छता मोहीम (ता. २८ सप्टेंबर)
ठिकाण – कापडबाजार परिसर
सहभागी – माजी नगरसेवक संजय चोपडा, अश्विन गांधी व व्‍यापारी वर्ग, भाग्‍योदय माध्‍यमिक विदयालय, महिला बचत गट, महापालिका कर्मचारी अतिक्रमण, विद्युत, प्रकल्प विभागाचे सर्व कर्मचारी

स्वच्‍छता मोहीम (ता. २९ सप्टेंबर)
ठिकाण – वस्‍तू संग्रहालय ते भारतीय स्‍टेट बँक चौक  
सहभागी – महिला बचत गट, जगदंबा माध्‍यमिक विद्यालयाचे विद्यार्थी महापालिका कर्मचारी प्रभाग समिती कार्यालय क्र. ३

प्‍लॉगीथॉन (ता. २९ सप्टेंबर)
ठिकाण – प्रोफेसर चौक
सहभागी – अहमदनगर रनर्स ग्रुप

स्वच्‍छता मोहीम (ता. ३० सप्टेंबर)
ठिकाण – बागरोजा परिसर
सहभागी – माजी महापौर रोहिणी शेंडगे, महिला बचत गट, यशवंत माध्‍य‍मिक विद्यालयाचे विद्यार्थी, महापालिका कर्मचारी नगर रचना विभाग सर्व कर्मचारी

सफाई मित्र सुरक्षा शिबिर (ता. ३० सप्टेंबर)
ठिकाण – प्रभाग समिती कार्यालय क्र.१ व २ सफाई कर्मचारी
सहभागी – वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी

शौचालय स्‍वच्‍छता (ता. १ ऑक्‍टोबर)
ठिकाण – सार्वजनिक व सामुदायिक शौचालय
सहभागी – सर्व मुख्‍य स्‍वच्‍छता निरीक्षक, सर्व स्‍वच्‍छता निरीक्षक

सफाई मित्र सुरक्षा शिबिर (ता. १ ऑक्‍टोबर)
ठिकाण – प्रभाग समिती कार्यालय क्र.३ व ४ सफाई कर्मचारी
सहभागी – वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी

स्‍वच्‍छता मोहीम (ता. १ ऑक्‍टोबर)
ठिकाण – महालक्ष्‍मी उद्यान
सहभागी – विश्‍वंभरदास नयर माध्‍यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, श्री.स्‍वामी समर्थ युवा प्रतिष्‍ठाण, अक्षय भगत महापालिका कर्मचारी-उद्यान विभाग सर्व कर्मचारी