AMC | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पराग बिल्डींग येथे महापालिकेची पाईपलाईन आज (ता. ११) पहाटे ५.४५ वाजता फुटली. पाईपलाईन दुरुस्तीचे काम अहिल्यानगर महापालिकेच्या (AMC) कर्मचाऱ्यांमार्फत युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे स्टेशन परिसर, आगरकर मळा, विनायक नगर येथील पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होईल.
हे वाचा – पाथर्डी पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
पाईपलाईन दुरूस्तीचे काम (AMC)
पाईपलाईन दुरूस्तीचे काम रात्री पूर्ण करण्याचे प्रयत्न महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम झालेनंतर स्टेशन परिसर, आगरकर मळा, विनायक नगर येथील पाणी पुरवठा हा बुधवार (ता. ११) ऐवजी गुरुवारी (ता. १२) करण्यात येईल.
हे पहा – अजितदादांबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली…
अहिल्यानगर महापालिकेचे आवाहन (AMC)
गुरुवारी (ता. १२) पाणी पुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागाला म्हणजेच सारसनगर, बुरूडगाव रोड, माणिकनगर, टिळक रोड आदी परिसराला गुरूवार ऐवजी शुक्रवारी (ता. १३) पाणी पुरवठा करण्यात येईल. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.



