AMC : अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, महिला बालकल्याण व स्थायी समिती सदस्यांच्या निवडी जाहीर

0
AMC : अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, महिला बालकल्याण व स्थायी समिती सदस्यांच्या निवडी जाहीर
AMC : अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, महिला बालकल्याण व स्थायी समिती सदस्यांच्या निवडी जाहीर

AMC : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) महानगरपालिका येथे आज विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत स्वीकृत नगरसेवकांची (Approved Corporator) नावे तसेच स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. विविध पक्षांच्या गटनेत्यांनी आपापल्या सदस्यांची यादी महापौर (Mayor) ज्योती गाडे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर सभागृहात ही घोषणा करण्यात आली.

हेही वाचा : ‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा!

स्वीकृत नगरसेवक

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकी जगताप, रेवणनाथ पवार आणि बाबासाहेब नागरगोजे यांची निवड जाहीर करण्यात आली. भाजपकडून रवींद्र बारस्कर आणि विशाल नाकाडे यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी आदेश सुरेश जाधव यांचा अर्ज कागदपत्रे अर्धवट असल्याने फेटाळला गेला. शपथपत्र नसल्याने त्यांचा अर्ज रद्द झाला असून पुढच्या सभेत त्याच पक्षाच्या कोट्यातून नियुक्ती होणार असल्याची माहिती आहे.

स्थायी समिती सदस्य (AMC)

स्थायी समिती सदस्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून गौरी बोरकर, सुरेश बनसोडे, संध्या पवार, मीना चोपडा, पौर्णिमा गव्हाळे आणि हरप्रीतकौर गंभीर यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपकडून सुभाष लोंढे, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, मनोज दुल्लम, मनोज कोतकर आणि सोनाबाई शिंदे यांची नावे जाहीर झाली. शिवसेना (शिंदे गट) कडून नवनाथ कातोरे आणि सुनिता गेनप्पा यांची निवड झाली आहे. काँग्रेसकडून मिनाज खान तर एआयएमआयएमकडून शेहनाज शेख यांचा स्थायी समितीत समावेश करण्यात आला आहे.

हे पहा : बोगस खत विक्री करणाऱ्यांवर महिनाभरात तिसरा गुन्हा दाखल

महिला व बालकल्याण समिती सदस्य (AMC)

दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांचीही अधिकृत घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून दीपाली बारस्कर, सुनीता भिंगारदिवे, अनिता शेटिया, काजल भोसले, सुनीता कांबळे आणि अश्विनी लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून वंदना ताठे, शितल ढोणे, पुष्पा बोरुडे, आशा कातोरे, रोशनी त्र्यंबके आणि वर्षा सानप यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून मंगल लोखंडे आणि रुपाली दातरंगे यांची निवड झाली असून काँग्रेसकडून मिनाज खान आणि एआयएमआयएमकडून शेहनाज शेख यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here