AMC : नगर : नगर महापालिकेच्या (AMC) प्रशासकपदाची सूत्रे शासन निर्देशानुसार डॉ. पंकज जावळे (Pankaj Jawale) यांच्याकडे देण्यात आले आहेत. या प्रशासक पदाची सूत्रे हाती घेताच आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या सर्व विभागांना भेटी देऊन विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांना आपापली प्रशासकीय (administrative) कर्तव्य तत्परतेने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
हे देखील वाचा : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला नगरचा सराफ व्यावसायिक; महिलेकडून चक्क दहा लाखाची मागणी
यावेळी डॉ. जावळे यांनी सर्व विभागप्रमुखांना स्वच्छता राबवण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती मागवून विभागात असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची देखील माहिती संकलित करण्याचे आदेश दिलेले आहेत. कामचुकार कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही डॉ. जावळे यांनी दिले आहेत. महापालिकेत आता प्रशासक राज सुरू झाले असल्याने प्रशासक म्हणून महापालिका प्रशासनाचे सर्व अधिकार आयुक्त डॉ. जावळे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. जावळे शहराचे अनेक प्रश्न ते कसे हाताळतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा : नगर जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखविले जाणार : जिल्हाधिकारी सालीमठ