America and Israel Attack Iran : अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

America and Israel Attack Iran : अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

0
America and Israel Attack Iran : अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
America and Israel Attack Iran : अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

America and Israel Attack Iran : नगर : इराण वर अमेरिका व इस्राईलने केलेल्या हल्ल्यामुळे (America and Israel Attack Iran) जगभर तणावाचे वातावरण बनले आहे. याचा जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. खास करून कच्चे तेल (Crude Oil)नसर्गिक वायूच्या (Natural Gas) दरांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे युद्धात सामील नसलेल्या देशांनाही याची झळ सहन करावी लागत आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

इराणच्या जोरदार प्रतिहल्यांमुळे युद्ध आणखी भडकलं

अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे हल्ल्यामुळे इराणमध्ये आपत्कालीन स्थिती आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही मृत्यू झाला आहे. याचा बदल घेण्यासाठी इराणने अमेरिका आणि इस्रायवर जोरदार प्रतिहल्ले सुरू केल्यामुळे हे युद्ध आणखी भडकलं आहे. या युद्धाच्या झळा आता जगातील अनेक देशांना बसत असून तेलाच्या निर्यातीत अडथळे निर्माण झाले आहेत.

नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी बंद! (America and Israel Attack Iran)

इराणने तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने कब्जा मिळवला असल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने केला. या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जातील असा इशारा इशारा दिला.यामुळे जागतिक व्यापार ठप्प होण्याची चिन्हे आहेत. याचा फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे शेकडो रशियन तेल टँकर समुद्रात अडकले आहेत.

यामुळेच अमेरिकेने भारतासाठी एक मोठा निर्णय घेतला असून, समुद्रात अडकलेल्या रशियन तेल टँकर खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकेकडून ३० दिवसांची सूट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेवरील वाढलेला दबाव कमी करण्यासाठी समुद्रात अडकलेले रशियन तेल टँकर भारताला विकण्यासाठी ३० दिवसांसाठी सूट देण्यात आल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. ही तात्पुरती सूट असून सध्या समुद्रात उभ्या असलेल्या जहाजांना लागू होणार असल्याचेही म्हटले आहे.

भारत अमेरिकेची वसाहत नाही

भारताने रशियाकडून तेल आयात करावे, यासाठी अमेरिकेने ३० दिवसांची सूट दिल्याची बातमी समोर आली. यावर आता विरोधक टीका करत आहेत. “भारत हा एक स्वतंत्र तसेच लोकशाही देश आहे, ही काय अमेरिकेची किंवा इतर कोणत्याही देशाची कॉलनी नाही. ट्रम्प यांच्या काळात जगाला वेठीस धरण्याचे जे काही प्रकार अमेरिका करत आहे, ते फक्त पैसा, सत्ता व सैन्य ताकदीच्या जोरावर. भारताच्या सरकारने आपल्या परराष्ट्र धोरणावर जरा अधिक लक्ष दिले पाहिजे. भारताच्या स्वाभिमानाला धोका निर्माण होऊ देऊ नये”, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली.

परवानगी द्यायला भारत काय अमेरिकेचा गुलाम आहे का?
शिवसेनेचे (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी या प्रकारावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. “रशियाकडून तेल घेण्यास अमेरिका आपल्याला परवानगी देत आहे. अमेरिका भारताला नाचवत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतली झाले आहेत. अमेरिकेच्या सचिवांनी एक्सवर जी पोस्ट केली ती खेदजनक आहे. अशी परवानगी गुलाम राष्ट्रांना दिली जाते”, परवानगी द्यायला भारत काय अमेरिकेचा गुलाम आहे का? अशी टीका संजय राऊत यांनी केली.