Amhi Jarange Movie: मनोज जरांगेंचा संघर्ष रुपेरी पडद्यावर;’आम्ही जरांगे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज 

गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं की, डोळ्यासमोर एकाच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil). मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे”हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

0
Amhi Jarange : मनोज जरांगेंचा संघर्ष रुपेरी पडद्यावर;'आम्ही जरांगे' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज 
Amhi Jarange : मनोज जरांगेंचा संघर्ष रुपेरी पडद्यावर;'आम्ही जरांगे' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज 

Manoj Jarange: गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं की, डोळ्यासमोर एकाच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil). मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे”हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर (Trailer Relese) आज रिलीज झाला आहे. त्यामुळे गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे.

नक्की वाचा : पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वातावरण तापलं ;आज ‘या’ ठिकाणी बंदची हाक 

अभिनेते मकरंद देशपांडे यांनी साकारली मनोज जरांगेंची भूमिका (Amhi Jarange Movie)

“आम्ही जरांगे” या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे यांनी साकारली आहे. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारली आहे. इतकच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारत आहेत. या सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे हे देखील महत्वाची भूमिका साकारत आहेत.

अवश्य वाचा : ‘आंदोलन मोडायच्या मागे लागू नका’;मनोज जरांगे कडाडले

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या क्रांतिकारी चित्रपटाची कथा – पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. तर संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत.

१४ जूनला चित्रपट होणार प्रदर्शित  (Amhi Jarange Movie)

मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. खऱ्या आयुष्यात मराठ्यांचा साथ मिळवल्या नंतर आता आरक्षणाच्या चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील ह्यांना मोठ्या पडद्यावर सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल. ”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” हा चित्रपट १४ जूनला आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here