Amit Gorakhe | शेवगाव : मागील सत्तर वर्षात काँग्रेसला जे सुचलं नाही, ते भाजपने करुन दाखवले. माझ्यासारख्या मागास घटकातील सामान्य युवकाला विधान परिषदेवर संधी दिली. रामनाथजी कोविंद व द्रोपदी मुर्मु यांना राष्ट्रपती केले. तर लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर ताब्यात घेतले. ३७० सारखे कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विदेशात जाऊन, सर्व आरक्षण रद्द करणार असल्याचे सांगत असून संविधानाचा निळा रंग बदलून लाल रंगाचे संविधान दाखवत आहेत. त्यांच्यापासून संविधानाला खरा धोका असून ते काय संविधाचे रक्षण करणार, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे (Amit Gorakhe) यांनी बोधेगाव येथे महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे (Monica Rajale) यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेमध्ये केले.
नक्की वाचा: श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांच्या सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?
यांची उपस्थिती (Amit Gorakhe)
यावेळी गुजरातचे आमदार महेश कासवाल, विवेक मिसाळ, चंद्रकांत काळोखे, दादाराव भोसले, बापूसाहेब भोसले, सुभाष बर्डे, बापूसाहेब पाटेकर, भीमराज सागडे, बाबा राजगुरु, अनिल वडागळे, भगवान साठे, मिना कळकुंभे, सुरेश भागवत, रवी आरोळे, अस्मान घोरतळे, संतोष वाबळे, दिलीप विखे, शरद चाबुकस्वार, नवनाथ भवार, भाऊसाहेब पाटील, अशोक ससाणे, अशोक खिळे, संजय खेडकर, सचिन बारस्कर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष कासमभाई शेख, भाजपचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सचिन वारकड, संदीप देशमुख, विक्रम बारवकर, सुगंध खंडागळे, लहूराव भवर, अंबादास ढाकणे, महेश घोरतळे, सुनील राजपुत, सचिन भारस्कर, कुद्दुस पठान, राजेंद्र डमाले, विक्रम देशमुख, प्रा. भाऊसाहेब मुरकुटे यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : ‘जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगींना महाराष्ट्रात आणले जातय’- शरद पवार
अनुसुचित जाती जमातींना प्रतिनिधीत्व दिले (Amit Gorakhe)
आमदार गोरखे म्हणाले, मोदी सरकारच्या काळामध्ये ३७० सारखे कलम हटवून तिथे अनुसुचित जाती जमातींना प्रतिनिधीत्व दिले आहे, आण्णाभाऊ साठे यांचे भारतातच नाही तर रशियामध्ये जाऊन स्टॅचू उभारण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक व्हावे, अशी सर्व मातंग समाजाची मागणी होती. पुण्यामध्ये पाच एकर जमीन देवून त्याठिकाणी स्मारकाचे काम झाले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन मधील घर मिळविण्याचे व दिक्षा भूमी व चैत्यभूमीला निधीची मोठी तरतूद करण्याचे काम भारतीय जनता पक्ष, महायुतीच्या काळात झाले आहे.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, दहा वर्षात राजकीय, सामाजिक प्रवासात प्रत्येक गावाला काही ना काही दिले. सर्व जातीपातीचे लोक विकासाच्या प्रवाहात आले तर तालुक्याला न्याय देता येतो. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची लोकप्रतिनिधी जबाबदारी असते, त्याच भावनेतून आजवर काम करत आहे. त्यामुळेच रस्ते, वीज आणि पाण्याचा प्रश्न आज मार्गी लागले आहेत. यापुढील काळात उदयोगधंदयांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करावयाचा आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीला सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम केसभट, तर सूत्रसंचलन सोमेश्वर शेळके यांनी केले. यावेळी आमदार गोरखे यांच्या उपस्थितीत परिसरातील अस्मानराव घोरतळे, संतोष वाबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.