Amit Shah : नगर : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कांदा (Onion) प्रश्नी शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरणारी आहे, अशातच कांदा निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी किंवा नाफेड मार्फत योग्य भावात सरकारने कांदा खरेदी केंद्र सुरू करावेत, यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली आहे. यावर अमित शाह (Amit Shah) यांनी लवकरात-लवकर केंद्र सरकार कांद्याच्या निर्याती संदर्भात निर्णय घेईल. यावर लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय घेईल, असे शाह यांनी विखे पिता-पुत्रांना आश्वासीत केले आहे. कांद्या संदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि सरकारकडून असलेली अपेक्षा शाह यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे. त्यात नगर, नाशिक, पुणे या कांदा पट्यातील शेतकरी पूर्ण कांदा पिकावर अवलंबून असतो. त्यामुळे कांदा प्रश्न लवकरात- लवकर मार्गी लागावा, यासाठी विखे पिता-पुत्रांची शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.
नक्की वाचा : मनोज जरांगेंचा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा
तोडगा काढण्याची विनंती (Amit Shah)
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही वाजू शकतात. अब की बार ४०० पारची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शाह यांची भेट घेतली होती. आज (गुरुवारी) पुन्हा खासदार विखे यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतली आहे. ही भेट कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तसेच यावेळी शाह यांनी विखे पितापुत्रांसोबत महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडी आणि परिस्थितीवर महत्त्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते.
हे देखील वाचा: नारायण राणेंना भाजपने त्यांची जागा दाखवली – विनायक राऊत
विखेंच्या अमित शाहांबरोबर सातत्याने भेटी (Amit Shah)
दरम्यान, या भेटी वेळी शाह यांनी राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर देखील सविस्तर चर्चा केली. विरोधकांप्रमाणे सत्तेत असलेल्या भाजपनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, पक्षांतर्गत खात्रीशीर उमेदवारांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत अंतर्गत पातळीवर देण्यात आल्याची माहिती समजते. तसेच उमेदवारांच्या नावांची घोषणा नसल्याने इच्छुकांच्या हालचाली सुरूच असल्याचे काही ठिकाणी चित्र आहे, अशातच सुजय विखेंच्या पक्षाचे महत्वपूर्ण नेतृत्व असलेल्या अमित शाहांसोबत सातत्याने भेटी होत आहे.