Amit Thackeray : मनसेच्या दोन गटात अमित ठाकरेंसमोरच वाद?

Amit Thackeray : मनसेच्या दोन गटात अमित ठाकरेंसमोरच वाद?

0
Amit Thackeray : मनसेच्या दोन गटात अमित ठाकरेंसमोरच वाद?
Amit Thackeray : मनसेच्या दोन गटात अमित ठाकरेंसमोरच वाद?

Amit Thackeray : नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या समोरच आज दुपारी मनसे (MNS)महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNS Vidyarthi Sena) कार्यकर्त्यांत वाद झाल्याचे समजते.

नक्की वाचा : मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण; पोलीस अधीक्षकांना निवेदन

नेत्यांमध्ये उमेदवारीवरून सुप्त राजकीय सुंदोपसुंदी सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी व पक्ष कार्यकर्त्यांत ऊर्जा भरण्यासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे राज्यभर दौरे करत आहेत. याचाच एक भाग म्हणून ते नगर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने या दौऱ्याला राजकीय महत्त्व आले आहे. अशातच नगर शहरातील मनसेच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून सुप्त राजकीय सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. याचाच प्रत्यय आज अमित ठाकरे यांना पहायला मिळाला.

अवश्य वाचा : आमदार थोरात यांचा “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्काराने गौरव

धक्का लागल्याचे कारण करत मनसे व मनविसेच्या कार्यकर्त्यांत वाद (Amit Thackeray)

अमित ठाकरे हे नगरमधील एका मनसे नेत्याच्या कार्यालयाचे उद्घाटन व पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी नगरमधील तारकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी मनविसेच्या पदाधिकाऱ्याचा एका व्यक्तीला धक्का लागल्याचे कारण करत मनसे व मनविसेच्या कार्यकर्त्यांत वाद झाल्याचे समजते. या वादाच्या वेळी अमित ठाकरे उपस्थित असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे मनविसेचा तो पदाधिकारी तातडीने कार्यकर्त्यांसह तेथून निघून गेला. त्यामुळे वादावर पडदा पडला असला तरी नगर जिल्ह्यातील मनसेत सुप्त संघर्ष असल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आल्याची चर्चा आहे.