Amit Thackeray : धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली : अमित ठाकरे

Amit Thackeray : धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली : अमित ठाकरे

0
Amit Thackeray : धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली : अमित ठाकरे
Amit Thackeray : धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली : अमित ठाकरे

Amit Thackeray : नगर : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे तत्कालिन ठाकरे सरकार कोसळलं. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिले. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते आणि माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा: प्रकाश आंबेडकरांची प्रकृती बिघडली,रुग्णालयात दाखल

२०२१ च्या जून महिन्यात शिवसेनेत मोठी फूट पडली

२०२१ च्या जून महिन्यात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन भाजपाला समर्थन दिलं. त्यामुळे शिवसेनेकडे आणि पर्यायाने महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याने त्यांना सत्ता सोडावी लागली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तर, दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपाने त्यांच्याकडे असलेलं बहुमत सिद्ध केलं अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. राज्यात एकीकडे अशी उलथापालथ झालेली असताना शिवसेनेतील बंडाळीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली.

अवश्य वाचा: “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय” : शरद पवार

अमित ठाकरे म्हणाले की, (Amit Thackeray)

यावरून एका वहिनीला मुलाखत देतांना अमित ठाकरे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं चिन्हआणि नाव घेतलं, ते चुकीचं केलं. नागरिक म्हणून पाहताना ते मला चुकीचं वाटतंय. पक्षचिन्ह आणि पक्षनाव बाळासाहेबांचं आहे, ते त्यांचंच राहायला पाहिजे होतं. लोकांच्या विश्वासाने त्यांनी हे निर्माण केलं होतं.” त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धनुष्यबाण चिन्हांबाबतही अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.