नगर : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या माध्यमातून ते नेहमीच आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही जुने फोटो (Old Photos) शेअर केले आहेत. जे त्यांच्या शालेय जीवनातील म्हणजे सुमारे ७० वर्षांपूर्वीचे आहे.
नक्की वाचा : अभिमानास्पद! मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक
अमिताभ बच्चन यांनी शेअर केले जुने फोटो (Amitabh Bachchan)
हे फोटो अमिताभ बच्चन यांच्या शाळेतील त्या दिवसांचे आहे. जेव्हा ते स्काउट्सचा एक भाग असायचे. त्यानंतर ते अलाहाबादमधील शाळेत शिकले आणि त्याचा संघ जिंकला तेव्हा तो अभिमानाचा क्षण होता, असं या फोटोमध्ये दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये ते स्वत: आहेत आणि दुसऱ्यामध्ये ते ग्रुपसोबत उभे आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘बॉय स्काउट्सचे ते चांगले जुने दिवस.. स्पेशल स्कार्फ.. बॅज.. स्पेशल सॅल्युट.. त्याचे संस्थापक बॅडेन पॉवेल.. आणि त्यातील किती धडे अजूनही चालू आहेत.’ अमिताभ बच्चन यांच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
अवश्य वाचा : स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक,कसा आहे त्याचा प्रवास?
अमिताभ बच्चन यांचे शालेय शिक्षण कुठे झाले ? (Amitabh Bachchan)
अमिताभ बच्चन यांचे शालेय शिक्षण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाले. बच्चन हे त्यांच्या शाळेतील एक होतकरू विद्यार्थी होते,असे म्हटले जाते. अमिताभ बच्चन शाळेपासून खूप सक्रिय आहेत, त्यानंतर त्यांनी कॉलेजमध्येही अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबाद मधून झाले. परंतु त्यांनी काही वर्षे नैनितालमध्येही शिक्षण घेतले. १९६२ मध्ये,अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या करोमियल कॉलेजमधून बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.