Amol Khatal : आजचे बालवैज्ञानिक उद्याचे वैज्ञानिक : खताळ

Amol Khatal : आजचे बालवैज्ञानिक उद्याचे वैज्ञानिक : खताळ

0
Scientist : आजचे बालवैज्ञानिक उद्याचे वैज्ञानिक : खताळ
Scientist : आजचे बालवैज्ञानिक उद्याचे वैज्ञानिक : खताळ

Amol Khatal : संगमनेर : समाजात विविध समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे बालवैज्ञानिकांनी तयार केलेली आहे, त्यामुळे आजचे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक (Scientist) होतील, अशी अपेक्षा आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांनी व्यक्त केली.

नक्की वाचा : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार,नितीन गडकरींची घोषणा

गणित विज्ञान प्रदर्शनाचे आमदार खताळ यांच्या हस्ते उद्घाटन

संगमनेर येथील सिद्धार्थ विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संगमनेर तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष बी आर कदम, कार्याध्यक्ष ॲड. संघराज रुपवते, संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, संगमनेर तालुका विज्ञान, गणित संघटनेचे अध्यक्ष मनोज उपरे, बाळासाहेब राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते गणित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उपक्रमास भेट देत विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले.

Scientist : आजचे बालवैज्ञानिक उद्याचे वैज्ञानिक : खताळ
Scientist : आजचे बालवैज्ञानिक उद्याचे वैज्ञानिक : खताळ

अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

जवळपास १०० शाळातील विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग (Amol Khatal)

संगमनेर पंचायत समिती शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक दीपक त्रिभुवन यांनी प्रस्ताविक केले. संगमनेर तालुका विज्ञान, गणित संघटनेचे अध्यक्ष मनोज उपरे त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन कला शिक्षक प्रकाश पारखे यांनी केले. तर आभार सिद्धार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ जगताप यांनी मानले. यावेळी सर्व मान्यवरांना भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी मुख्याध्यापक उपस्थित होते. संगमनेर शहरातील सिद्धार्थ विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संगमनेर तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जवळपास १०० शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या ३५० उपकरणांची नोंद घेण्यात आली. संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता प्रदूषण निर्मूलनाविषयी माहिती देत विज्ञान शिक्षण ही काळाची गरज आहे, त्यातूनच प्रदूषणाचे निर्मूलन शक्य असल्याचे सांगितले.