Amol Khatal : संगमनेर: तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर काही ठेकेदार राजकीय हेतूने तसेच आमदारांना बदनाम करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक विकासकामे अपूर्ण ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे कोणत्याही ठेकेदाराने कामे वेळेत पूर्ण केली नाहीत किंवा अपूर्ण ठेवून सर्वसामान्य जनतेला त्रास दिल्यास अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई (Strict Action) करण्यात येईल. वेळप्रसंगी त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे (ब्लॅकलिस्ट) (Blacklist) सक्त निर्देश आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर
संगमनेर मतदारसंघातल्या विकासकामांचा आढावा
काही ठेकेदारांनी स्वतःची मक्तेदारी निर्माण करून एकाच वेळी चार-पाच कामे स्वतःकडे ठेवली होती. मात्र, ही कामे दर्जाहीन झाल्यामुळे वारंवार रस्त्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
हे देखील वाचा: दु:खदायक बातमी! यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसांत 22 शेतकरी आत्महत्या
कामे करताना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा (Amol Khatal)
या बैठकीत कामे करताना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपविभागीय अभियंता काशिनाथ गुंजाळ, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे, पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत चव्हाण यांच्यासह दोन्ही विभागांचे उपअभियंते उपस्थित होते.



