Amol Khatal : संगमनेर : आपण सव्वा वर्षाच्या काळात मतदार संघातील प्रत्येक गावा-गावांमध्ये निधी देण्याचे काम केले आहे आणि भविष्यातही करू असा विश्वास व्यक्त करत निधी वाटप (Fund Allocation) करताना कोण आपला अन् कोण-परका कधीही असा भेदभाव केला नाही ज्या भागावरती अन्याय झाला आहे, त्या भागासाठी प्राधान्याने विकासनिधी देण्याचा आपला प्रयत्न आहे. भविष्यात महायुती सरकारच्या (Mahayuti Government) माध्यमातून भरीव स्वरूपाचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी दिली. तालुक्यातील गुंजाळवाडी, राजापूर, निमगाव, भोजापुर, चिकणी, सायखिंडी आणि मेंगाळवाडी येथील विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नक्की वाचा : पारनेरमध्ये बालविवाह जनजागृती अभियान
खताळ यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
यावेळी भाजप ज्येष्ठ नेते नामदेव गुंजाळ, राघुनाना गुंजाळ, संभाजी गुंजाळ, सूर्यभान गुंजाळ, पंढरीनाथ गुंजाळ, रोहिदास गुंजाळ, सोमनाथ जगताप देवराज थोरात, विक्रम गुंजाळ, महेश जगताप, गोकुळ गुंजाळ राजापूर येथील, बबन हासे, सावळेराम खतोडे, अनाजी खडांगळे, आण्णा हासे, बाळासाहेब सोनवणे, ऋषिकेश हासे, गोपिनाथ सोनवणे, संदेश देशमुख, सोमनाथ खतोडे, निमगाव भोजापूर येथील ज्येष्ठ नेते कारभारी वलवे, सरपंच ज्योती कडलग, उपसरपंच प्रमोद कडलग, दत्तात्रय गुंजाळ, अशोक कानवडे, बाळासाहेब कडलग, लहानू पाटील चाबुस्कर, भाऊसाहेब धुमाळ, संतोष टपाले, त्र्यंबक फटांगरे, मनोहर कडलक, चिकणी येथील भाजप ज्येष्ठ नेते वाल्मिक शिंदे, सरपंच गायत्री माळी, उपसरपंच संदीप वर्पे, मनसेचे उप जिल्हाध्यक्ष दिपक वर्पे, एकनाथ वर्पे, मच्छिन्द्र विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
आमदार खताळ म्हणाले की (Amol Khatal)
आमदार खताळ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी अनेकांनी केवळ भूमिपूजनाचे फलक लावले, मात्र त्या कामांचे पुढे काय झाले याचा जाब जनतेने विचारणे गरजेचे आहे, येथून मागील कालावधीमध्ये निवडणुका आल्या की फक्त घोषणा व फलक लावून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.महायुती सरकारच्या माध्यमातून झालेला विकास गावागावातील जनतेपर्यंत पोहोचवणे ही कार्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी आहे.निळवंडे डावा आणि उजवा कालव्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे प्रवरा व म्हाळुंगी नदी वाहती आहे दोन्ही कालव्यांमुळे. गावातील बंधारे व तलाव भरून देण्यासाठी सरकार सहकार्य करत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.



