Amol Khatal : संगमनेर : मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील (Sangamner Constituency) पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांचा प्रश्न आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी सभागृहात उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. मतदारसंघातील काही गावे आजही निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) पाण्यापासून तसेच भोजापूर पूरचारी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात १५ मार्चला ‘विराट हिंदू संमेलन’; रामगिरीजी महाराज करणार प्रबोधन
पाण्याचा अभाव भासत असल्याने शेतीवर परिणाम
संगमनेर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर स्वरूप धारण करत आहे. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पुरेशा पाण्याचा अभाव भासत असल्याने शेतीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी विधानसभेत हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत संबंधित भागातील नागरिकांना दिलासा देण्याची गरज अधोरेखित केली.विशेषतः सायखिंडी आणि चिकणी या गावांसह परिसरातील अनेक गावे आजही पाण्याच्या सुविधांपासून वंचित असल्याचे त्यांनी नमूद केले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
शासनाने ठोस पावले उचलावीत (Amol Khatal)
या गावांतील शेतकरी आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने या भागासाठी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. निळवंडे धरण व भोजापूर पूरचारी योजनेचा लाभ न मिळालेल्या या भागातील नागरिकांना भविष्यात पाण्याचा तोडगा निघावा, यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. उपसा सिंचन योजना राबविल्यास या भागातील शेतीला मोठा दिलासा मिळेल तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. येत्या काळात यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



