Amol Khatal : संबधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाका; आमदार खताळ यांची विधानसभेत मागणी

Amol Khatal : संबधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाका; आमदार खताळ यांची विधानसभेत मागणी

0
Amol Khatal : संबधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाका; आमदार खताळ यांची विधानसभेत मागणी
Amol Khatal : संबधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाका; आमदार खताळ यांची विधानसभेत मागणी

Amol Khatal : संगमनेर: शहरातील कोल्हेवाडी रोडवर भूमिगत गटारीच्या साफसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, आणि हलगर्जीपणामुळे अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना (Contractor) काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी विधानसभेत (Assembly) केली. 

नक्की वाचा : पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड

सुरक्षा उपाययोजनांकडे पूर्णतः दुर्लक्ष

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अतुल पवार याच्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमानुसार ३० लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे. मात्र, रियाज पिंजारी याने जीवाची पर्वा न करता पवारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनाही शासनाने भरीव स्वरूपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. गटारीतील मैला हाताने साफ करण्यास प्रतिबंध आणि पुनर्वसन करणारा २०१५ चा कायदा अस्तित्वात असतानाही त्या ठेकेदाराने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सुरक्षा उपाययोजना पूर्णतः धाब्यावर बसविण्यात आल्या होत्या. चेंबरमधील मैला साफ करण्याचे काम यंत्रसामग्रीच्या साह्याने करणे गरजेचे असताना त्या ठेकेदाराने अतुल पवार यास कोणती ही सुरक्षा उपकरणे न देता त्याला चेंबरमध्ये उतरवले.

अवश्य वाचा : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा

चेंबरमधील विषारी वायूमुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू (Amol Khatal)

चेंबरमधील विषारी वायूमुळे पवार यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला रियाज यालाही जीव गमवावा लागला. या घटनेमुळे या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी, भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असे आमदार खताळ यांनी विधानसभेत ठामपणे सांगितले.