Amol Khatal : संगमनेर: भोजापूर पुरचारी परिसरातील गावांना जाणून-बुजून पाण्यापासून वंचित ठेवले गेले. निवडणूका (Election) जवळ आल्या की फक्त टँकरने चारीमध्ये पाणी आणून दाखवले जात होते. मात्र, आता या भोजापूर चारीत टँकरने पाणी न टाकता तळेगाव निमोण या दुष्काळी (Drought) भागातील जनतेला त्यांच्या हक्काचे भोजापूर धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी दिले जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी व्यक्त केला.
लाभक्षेत्रातील शेतकरी नागरिक उपस्थित
संगमनेर तालुक्यातील निमोण, तळेगाव या दुष्काळी भागाला काही गावांना वरदान ठरणारे भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाच्या पाण्याचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी थेट धरणापासून जाणाऱ्या डाव्या कालव्यावरील पुरचारी वरती अवलंबून असणाऱ्या पळसखेडे, निमोण कऱ्हे, सोनेवाडी, सोनोशी, वाटमाई देवी व गीते वस्ती या भागातील पूरचारीची पाहणी केली. यावेळी भोजापूर चारीचे अभ्यासक किसन चत्तर, अभियंता सेलचे अध्यक्ष हरीश चकोर, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे, महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, ज्येष्ठ नेते मारुती घुगे, नंदकुमार देशपांडे, तुकाराम घुगे, इंद्रभान घुगे, साहेबराव आंधळे, प्रकाश सानप, मिनीनाथ सानप यांच्यासह या पूरचारीच्या लाभक्षेत्रातील गावातील शेतकरी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, (Amol Khatal)
भोजापूर धरणावर जाऊन जलपूजन करून तिगाव माथ्यापर्यंत पाणी यापूर्वी पोहोचावे, असे साकडे घातले आहे. जलसंपदा खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आले आहे, त्यामुळे आता तुम्हाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. या पूरचारीसाठी मंत्री विखे पाटील यांच्याकडून २० कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे. निमोण व तळेगाव, या दुष्काळी भागातील गावांना हक्काचे पाणी मिळवून देण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझे ध्येय आहे. येथून मागे फक्त चारीमध्ये टँकरओतून पाणी आल्याचे भासविले गेले. माझ्या निमोण तळेगाव या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर तीगाव माथ्यापर्यंत या पुरचारीचे पाणी कसे पोहोचेल, यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे आमदार खताळ यांनी यावेळी सांगितले.