Amol Khatal : सावता महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त शोभायात्रा; आमदार खताळ यांनी दिला पालखीला खांदा

Amol Khatal : सावता महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त शोभायात्रा; आमदार खताळ यांनी दिला पालखीला खांदा

0
Amol Khatal : सावता महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त शोभायात्रा; आमदार खताळ यांनी दिला पालखीला खांदा
Amol Khatal : सावता महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त शोभायात्रा; आमदार खताळ यांनी दिला पालखीला खांदा

Amol Khatal : संगमनेर: शहरातील माळीवाडा येथे संत शिरोमणी सावता महाराज (Saint Savata Maharaj) संजीवन सोहळ्याच्या निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनिमित्त शहराच्या विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी उपस्थित राहून संत सावता महाराज यांच्या पालखीला श्रद्धेने खांदा दिला. 

नक्की वाचा : पुण्यातील धनकवडीत २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; २० ते २५ वाहनांची तोडफोड

जयघोषात शहर झाले भक्तिमय

माळीवाडा येथील हनुमान मंदिर येथून संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या पालखी व प्रतिमेच्या शोभायात्रेस प्रारंभ झाला. जय जय राम कृष्ण हरी.. ज्ञानेश्वर माऊली तुकारामचा जयघोष करत शहर दुमदुमून गेले होते. मुख्य रस्त्यावरील मेन रोड, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, बाजार पेठ, लाल बहादूर शास्त्री चौक, आणि नगरपालिका मार्गे ही यात्रा माळीवाडा येथे येऊन समाप्त झाली.

अवश्य वाचा : सुवर्णपदक विजेता देवदत्तने साधला I❤️नगरशी खास संवाद…

माळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी (Amol Khatal)

या शोभायात्रेत लालसाडी परिधान करून महिला तर सफेद कपडे घालून पुरुष भावीक भक्त सहभागी झाले होते. या शोभायात्रेत माळीवाडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अमित मंडलीक, उपाध्यक्ष भारत ढोले, सचिव अभिजीत पुंड, खजिनदार अतुल अभंग, भाजप शहर अध्यक्ष पायल ताजणे, महिला तालुकाप्रमुख कविता पाटील, रेखा गलांडे, शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे, संपत गलांडे, विकास पुंड, सौरभ देशमुख यांच्यासह सप्ताह कमिटीचे सर्व पदाधिकारी, माळी समाज बांधव मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते.