Amol Khatal : संगमनेर : बांधकाम कामगारांचे (Construction Worker) प्रकरण तयार करण्यासाठी शासनाकडून कोणताही खर्च येत नाही. केवळ एक रुपया शुल्क शासनाला भरावा लागतो तोही महायुती कार्यालयामार्फतच भरला जाईल, असे असतानाही बांधकाम कामगारांकडून कोणी पैसे घेत असेल, तर अशा व्यक्तीविरुद्ध पोलिसांत (Police) गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांनी दिला आहे.
अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार
१५०० बांधकाम कामगारांना भांडी वाटप
शहरातील मातोश्री लॉन्स येथे बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने तालुक्यातील १५०० बांधकाम कामगारांना आमदार खताळ यांच्या हस्ते भांडी वाटप करण्यात आली. त्यावेळी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. यावेळी अहिल्यानगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त रेवननाथ भिसले, सरकारी कामगार अधिकारी आप्पा चाटे, दुकाने निरीक्षक प्रकाश भोसले, ललित दाभाडे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे, भाजप शहर प्रमुख पायल ताजने, महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले, उप जिल्हाप्रमुख दीपाली वाव्हळ, शिवसेना महिला तालुकाप्रमुख संगीता बांबळे, शहर प्रमुख वैशाली तारे, रेखा गलांडे, ज्योती भोर, संगीता पुंड आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
आमदार खताळ म्हणाले की, (Amol Khatal)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य व तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना पोहोचविण्याचे काम महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा” या भूमिकेतून पारदर्शकपणे योजना राबवल्या जात आहे. भविष्यात बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारचे आजार उद्भवल्यास शासनाच्या वतीने स्वतंत्र रुग्णालयाची निवड केली जाणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तसेच त्यांच्या मुला मुलींच्या विवाहासाठी शालेय शिष्य वृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अर्थसाह्य दिले जात आहे. आत्तापर्यंत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने तालुक्यातील ४०,हजार ८३५ लाभार्थीं पैकी ४, हजार ७५४जणांना शिष्यवृत्ती दिली असून त्यावर आत्ता पर्यंत राज्य सरकारकडून ४ कोटी ४१ लाख दिले गेले आहे. २० सप्टेंबरपर्यंत ६ हजार ८४० भांडी संच वाटप पूर्ण केले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लवकरच तीन हजार बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. बांधकाम कामगारा प्रकरणावर आता ग्रामसेवकाच्या सही शिक्क्याची गरज नाही तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचा सही शिक्का आवश्यक आहे. तो जर तुम्हाला मिळत नसेल तर महायुतीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरा त्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कॉन्ट्रॅक्टरची सही शिक्कासुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे येथून पुढील काळामध्ये तालुक्यातील बांधकाम कामगारांनी या योजनेपासून वंचित राहू नये, असे आवाहन आमदार खताळ यांनी केले.