Amol Mitkari : राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी

Amol Mitkari : राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी

0
Amol Mitkari : राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी
Amol Mitkari : राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी

Amol Mitkari : नगर : अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा सुपारीबाज असा उल्लेख केल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी अकोल्यात असताना त्यांच्या गाडीची तोडफोड केली आहे.

नक्की वाचा : नवाब मलिक यांना कोर्टाचा दिलासा;वेेद्यकीय जामीन मंजूर

मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र (Amol Mitkari)

राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा : नगरमध्ये १२ ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू

अमोल मिटकरी म्हणाले की (Amol Mitkari)

“मनसेचे कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर उभे होते. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर हा प्रकार घडला. पण असे मागून हल्ले करुन काही होणार नाही, अशी गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. याप्रकरणी मी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.”

पुण्यातील मुसळधार पावसानंतर पाहणीसाठी आलेल्या राज ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर ते पुण्यात नसतानाही धरण भरल्याचे सांगत खोचक टीका केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर तिखट भाषेत टीका केली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा केला होता. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here