नगर : फॅशन, अभिनय, नृत्य अश्या विविध पैलू मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar). तिच्या अभिनयाचे चाहते फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत. सध्या अमृता जगभरात प्रवास करताना दिसत आहे. नुकतीच ती अमेरिकेच्या टूर (America Tour) वर गेली आहे. मात्र हा फक्त प्रवास नाही तर ही टूर तिच्या अगदी मना जवळची आहे. याच कारण देखील तितकच खास आहे. या टूर दरम्यान अमृताने अमेरिकेत तिचा नृत्याविष्कार (Dance invention) सादर केला आहे.
नक्की वाचा : ‘आता त्यांनी बंदूक टाकून मुख्य धारेत यायला हवं’;देवेंद्र फडणवीसांचे माओवाद्यांना आवाहन
अमृताचा अमेरिकेत नृत्याविष्कार (Amruta Khanvilkar)
“सुंदरी” हा सदाबहार नृत्यप्रयोग परफॉर्म करण्यासाठी अमृता या खास टूरवर आहे. विशेष म्हणजे अमृताची देखील ही पहिली USA वारी आहे. या खास टूरमध्ये ती स्वतःच्या आवडीचा खास नृत्याविष्कार यात सादर करताना दिसते. अमृताच नृत्य कौशल्य अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांनी अनुभवलं आहे आणि आजही तिच्या अदाकारी परॉर्मन्सवर चाहते तितकेच खुश होताना बघायला मिळतंय. अगदी लावणी पासून क्लासिकल नृत्या पर्यंत अमृताने कायम सगळ्यांना भारावून सोडलं आहे.
अवश्य वाचा : सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित;सती प्रथेवर आधारित चित्रपट
अमृता काय म्हणाली ? (Amruta Khanvilkar)
या बद्दल बोलताना अमृता सांगते ” पहिल्यांदाच मी आणि आशिष पाटील अमेरिकेत ” सुंदरी ” सारखा विशेष नृत्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत. आशिष च्या ‘नृत्य आशिष सुंदरी’ चा हा पहिला वहिला परदेश दौरा आहे. लावणीचा ठसका आणि कत्थकची नजाकत यांचा आगळा वेगळा संगम यातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळतोय याचा आनंद तर आहे. मात्र ही कला, स्त्रीत्व, आणि संस्कृतीची सुंदर गोष्ट आता परदेशात मराठी माणसांसाठी सादर होते आहे,याचा खूप अभिमान देखील आहे. संस्कृतीची सीमारेषा ओलांडणारा हा सोहळा साता समुद्रापार घडतोय याहून वेगळं सुख काय असणार. मराठी प्रेक्षक परदेशात सुद्धा तितकच प्रेम देतात हे बघून भारावून जायला होतंय”
अमृताच्या नृत्य कलेमुळे महाराष्ट्राची संस्कृती परदेशात देखील तितकीच प्रेम मिळवते याचा सगळ्यांना अभिमान आहे यात शंका नाही. मात्र येणाऱ्या काळात अमृता कोणत्या नवनवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे, याची उत्सुकता आहे.