नगर : कोणत्याही पहिल्या गोष्टीचं कौतुक काही वेगळं असतं असं आपण म्हणतो. असच काही अभिनेत्री अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar) आयुष्यात सुद्धा घडलं आहे. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सव सोहळा काल (ता.५) सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार (Maharashtra State Marathi Film Awards) प्रदान करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात अमृताला चंद्रमुखीसाठी (Chandramukhi) उत्कृष्ट अभिनेत्री (Outstanding Actress) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नक्की वाचा : अहिल्यानगरच्या डॉक्टरांच्या आजोबांनी पाळली होती सिंहीण;ती खायची दूध-भात
अमृता नेमकं काय म्हणाली ? (Amruta Khanvilkar)
अमृता सध्या भारतात नसली तरी अगदी साता समुद्रापार राहून तिने या बद्दलचा उत्साह आणि आनंद शेयर केला आहे. अमृता म्हणते “आज माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्र राज्याने मला हा मान देणं खरंखरोच खूप जास्त खास आहे. “चंद्रमुखी” साठी आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं. अगदी दिग्दर्शकापासून ते स्पॉट बॉयपर्यंत यांनी घेतलेली मेहनत ही कायम सार्थकी लागली आहे. ठिकठिकाणी या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हे आजही दिसून येतं आहे. मला जर एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळालेली आहे चंद्रमुखीसाठी तर ती मला माझ्या महाराष्ट्र राज्याने दिली आहे.
अवश्य वाचा : “कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही”-देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित होणं हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. हा माझा पहिला वाहिला राज्य पुरस्कार आहे. यातून ऊर्जा घेत मला नवनवीन दर्जेदार काम करत राहायचं आहे. चांगल्या लोकांबरोबर काम करायचं आणि आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची आहे. या निमित्ताने संपूर्ण ज्युरी टीमचे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार टीमचे खूप खूप आभार. त्यांनी हा क्षण माझ्या आयुष्यात आणला माझं कामाचं कौतुक करून हा खास पुरस्कार मला दिला या बद्दल मी कायम ऋणी राहील खूप खूप धन्यवाद”
अमृतासाठी चंद्रमुखी खास (Amruta Khanvilkar)
चंद्रमुखी सारख्या चित्रपटातील अमृताची भूमिका ही आजही प्रेक्षकांच्या मनात तितकीच घर करून आहे आणि म्हणून तिच्यासाठी हा चित्रपट देखील तेवढाच खास आहे. आजवर अमृताने वैविध्यपूर्ण आव्हानात्मक भूमिका साकारल्या आणि त्या आजही प्रेक्षकांना तितक्याच भावतात. येणाऱ्या काळात अमृता अनेक दर्जेदार भूमिका मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.