Amrutvahini : ‘अमृतवाहिनी’त रंगला मेधा महोत्सव; 1721 विद्यार्थ्यांचे धमाकेदार सादरीकरण

Amrutvahini : 'अमृतवाहिनी'त रंगला मेधा महोत्सव; 1721 विद्यार्थ्यांचे धमाकेदार सादरीकरण

0
AmrutVahini

Amrutvahini : संगमनेर : विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला मेधा महोत्सव (Medha Festival) हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरला असून केजी टू पीजी, अशा ‘अमृतवाहिनी’ (Amrutvahini) तील सर्व विभागांच्या एक हजार 721 विद्यार्थ्यांनी विविध दर्जेदार व धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural events) सादर करून मेधा महोत्सवात रंग भरले.

हे देखील वाचा : लाेकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; नगर जिल्ह्यात कधी होणार मतदान जाणून घ्या…

सिनेअभिनेत्री ऋता दुर्गुळेची विशेष उपस्थिती (Amrutvahini)

अमृतवाहिनीच्या मेधा मैदानावर झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात, सिनेअभिनेत्री ऋता दुर्गुळे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ज्ञ डॉ.जयश्री थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम.ए.वेंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा जी.बी.काळे, प्राचार्य डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ.मनोज शिरभाते, डॉ बाबासाहेब लोंढे, प्रा. व्ही व्ही भाटे, जे.बी.शेट्टी, शीतल गायकवाड, अंजली कण्णावर, प्रा.विलास शिंदे, प्रा.अशोक वाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

AmrutVahini

नक्की वाचा : मोठी बातमी! राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य

सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिततानी भरभरून दाद (Amrutvahini)

यावेळी अमृतवाहिनी सर्व विभागातील शंभर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गणेश वंदनेवर ढोल ताशांचा गजर केला. न्यूडो स्कूलच्या लहानग्यांनी हिंदुस्तान हमारा या गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. तर मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले मराठमोळे फ्युजन सॉंग लक्षवेधी ठरले. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या फ्युजन लावण्याना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. तर हॉरर भुतांचा शो असलेल्या फॅशन शोने सर्वांच्या अंगावर शहारे आले.

बी फार्मसी च्या विद्यार्थिनींनी सादर केलेले फ्युजन सॉंग वेळी विद्यार्थ्यांनी एकच धमाल केली. तर अमृतवाहिनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले मोबाईलचे दुष्परिणाम या गीताने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकविला.ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भारताची एकात्मता दाखवणारा फॅशन शो.तर अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले गोंधळी नृत्य भारावून टाकणारे होते.

याचबरोबर डी फार्मसीचा गारबा नृत्य, एमबीएचे राजस्थानी नृत्य,बिहू नृत्य अशा वेगवेगळ्या दर्जेदार कार्यक्रमाने सर्वांना खेळवून ठेवले. लहान मुलांच्या समूहनृत्यांमधील जुगलबंदी पाहताना संगमनेर करांच्या आनंदाला पारावर उरला नाही.विक्रमी गर्दी झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिततानी भरभरून दाद दिली.

आकर्षक स्टेजव्यवस्था,डेकोरेशन, लाईट, बैठक व्यवस्था,एलईडी स्क्रीन, पार्किंग व्यवस्था, पालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था यामुळे या दर्जेदार कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभागामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here