Pankaja Munde: पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वातावरण तापलं ;आज ‘या’ ठिकाणी बंदची हाक 

शिरूर तालुक्यातील रायमोहा येथे एकानं आक्षेपार्ह्य पोस्ट केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर शहर बंद करण्याचं आवाहन सकल वंजारा समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आले आहे.

0
Pankaja Munde: पंकजा मुंडेबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वातावरण तापलं ;आज 'या' ठिकाणी बंदची हाक 
Pankaja Munde: पंकजा मुंडेबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वातावरण तापलं ;आज 'या' ठिकाणी बंदची हाक 

Shirur Bandh : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पंकजा यांच्याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Taluka) शिरापूर मध्ये एका युवकानं आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून संपूर्ण जिल्ह्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर काल (ता.७) सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीनं पाथर्डी बंदची हाक देण्यात आली होती. आता याचे पडसाद बीड जिल्ह्यात देखील पाहायला मिळालेत. त्यामुळे आज बीड जिल्ह्यातील शिरूर कासार (Shirur Kasar) शहर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.

नक्की वाचा : कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार

पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट (Pankaja Munde)

शिरूर तालुक्यातील रायमोहा येथे एकानं आक्षेपार्ह्य पोस्ट केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर शहर बंद करण्याचं आवाहन सकल वंजारा समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत बीडचा धक्कादायक निकाल लागला आहे. बीडमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी दणदणीत विजय मिळवला.

अवश्य वाचा : वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार ‘झाड’ चित्रपटातून;ट्रेलर लाँच   

नेमकं काय घडलं ? (Pankaja Munde)

बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांची  वाढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय पक्का असल्याचं बोललं जात होतं. मात्र बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आणि या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचा निकाल जाहीर झाला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीनं फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह मजकूर लिहिला होती.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here