ANAMPREM : अनामप्रेमतर्फे अंध व अपंगांसाठी कार्यशाळेचे आयोजन

ANAMPREM : अनामप्रेमतर्फे अंध व अपंगांसाठी कार्यशाळेचे आयोजन

0
ANAMPREM : अनामप्रेमतर्फे अंध व अपंगांसाठी कार्यशाळेचे आयोजन
ANAMPREM : अनामप्रेमतर्फे अंध व अपंगांसाठी कार्यशाळेचे आयोजन

ANAMPREM : नगर : येथील अनामप्रेम (ANAMPREM) संस्थेतर्फे ब्रेल लिपीचे (Braille Script) जनक लुईस ब्रेल यांच्या २१५ व्या जयंतीनिमित्ताने ४ व ५ जानेवारी २०२५ रोजी अंध व्यक्तींसाठी निवासी स्वयंचलन कार्यशाळा व अपंगांच्या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अहिल्यानगर शहराजवळील निंबळक येथे असलेल्या अनामप्रेम – सत्यमेव जयते (Satyamev Jayate) ग्राम प्रकल्पात ही कार्यशाळा होईल.

नक्की वाचा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

अपंगांच्या कायदे विषयक माहिती देणार

या कार्यशाळेत अंधजनांसाठी स्वयंचलन (मोबिलिटी), मनःशांती, ध्येय निश्चिती व अपंगांच्या कायदे विषयक माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळेत पुण्यातील एस.पी कॉलेजमधील प्रा. योगिता काळे या मार्गदर्शन करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील ६ ते ३५ वयोगटातील सर्व अंध बांधवांना याचा उपयोग होणार आहे. कार्यशाळा सकाळी १० ते ५ यावेळेत होणार आहे. यासोबतच राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे विद्यमान उपाध्यक्ष रघुनाथ बारड हे अपंगांच्या कायदे संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्वांसाठी चहा, नाष्टा, भोजन,निवास व वाहन व्यवस्था ही संस्थेतर्फे मोफत करण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री

प्रा.योगिता काळे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करणार (ANAMPREM)

जन्मत: अंध किंवा कालांतराने अंधत्व आलेल्या ६ ते ३५ या वयोगटातील व्यक्तींना चालण्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अंधत्वामुळे मानसिक आणि शारीरिक पातळीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अशावेळी अंधत्वावर मात करून रोजच्या कामात कशी सुलभता आणावी यावर या कार्यशाळेत प्रा.योगिता काळे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यशाळेत अंध मुली व महिलांसाठी एक विशेष सत्र घेण्यात येणार आहे. तसेच या कार्यशाळेत रघुनाथ बारड हे देखील अपंगांच्या विविध कायदेविषयक मार्गदर्शक करणार आहेत. या कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी अनामप्रेमच्या सुरेखा राठोड, अमृत भुसारी, विष्णू वारकरी अथवा राजू भगत यांच्याशी संपर्क साधावा.