Anand Bhandari : नगर : एखाद्याच्या आयुष्याला दिशा देण्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचा सर्वाधिक प्रभाव असतो. जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळांमध्ये सर्वसामान्यांची मुले शिकतात. त्यामुळे या शाळा समृद्ध झाल्या पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari) यांनी केले आहे. शिक्षक बँकेच्या ॲपद्वारे (NEFT) व (IMPS) या जलद आर्थिक व्यवहाराच्या सेवांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद सुद्रिक हे होते.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समिती गण आरक्षण जाहीर
यावेळी आनंद भंडारी म्हणाले,
भौतिक सुविधांबरोबरच शाळांमध्ये वाचन चळवळ सुरू व्हावी. प्रत्येक शाळेत अद्यावत वाचनालय असावे. आपण सुरू केलेला माझी आदर्श शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या १०० पेक्षा जास्त पट असलेल्या ६०१ शाळांची प्राधान्याने निवड करण्यात आलेली असून या शाळा सर्वच बाबतीत समृद्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक पालकाला असे वाटले पाहिजे की माझीही मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकली पाहिजेत. आपल्यातील अनेक शिक्षक तसेच अनेक विद्यार्थी साहित्यिक, कवी आणि कलाकार आहेत. आपल्या संघटनेच्या मार्फत जिल्ह्यातील शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन/कवी संमेलन आयोजित करून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. गेल्या चार महिन्यात आपले अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार आहे, असे त्यांनी म्हटले.
नक्की वाचा : चिथावणीखोर वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही : अभिषेक कळमकर
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले, (Anand Bhandari)
शिक्षक बँकेचा राज्यामध्ये मोठा नावलौकिक असून बँकेच्या ॲपद्वारे सुरु होत असलेल्या IMPS आणि NEFT सारख्या सुविधा आता शिक्षकांच्या मोबाईलमध्ये आल्यामुळे बँकेच्या लौकिकात भरच पडलेली आहे. बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर यांनी बँकेच्या सभासद हिताच्या विविध योजनांचा उल्लेख करत शिक्षकांच्या समृद्धीमध्ये बँकेचा मोठा वाटा असून आता सभासदांना घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे जलद व सुरक्षित पध्दतीने आर्थिक व्यवहार करता येणार आहेत.
यावेळी दत्ता पाटील कुलट, राज्य संपर्कप्रमुख गोकुळ कळमकर, विभागीय अध्यक्ष राजेंद्र सदगीर, राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण साळवे, शिक्षक नेते अर्जुन शिरसाठ, बाबा खरात, संघाचे जिल्हाध्यक्ष बबन गाडेकर, मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे, उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुदनर, ऐक्य मंडळाचे नेते बाळासाहेब कदम, शिक्षक भारतीचे मुकेश गडदे, परिवर्तन मंडळाचे राजेंद्र विधाते, उपाध्यक्ष योगेश वाघमारे, संचालक डॉ. संदीप मोटे पाटील, रामेश्वर चोपडे, निर्गुणा बांगर-कापसे, कारभारी बाबर, अण्णासाहेब आभाळे, कल्याण लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, महेश भनभणे, ज्ञानेश्वर शिरसाठ,कैलास सारोक्ते, सरस्वती घुले, शशिकांत जेजुरकर, शिवाजी कराड, माणिक कदम या संचालकांसह विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, सचिव संतोष आंबेकर, विश्वस्त संतोष मगर, राजेंद्र निमसे, बाळासाहेब गमे, मुकुंद सातपुते उपस्थित होते.
यावेळी बापूसाहेब शिंदे म्हणाले, वरुर ता.शेवगाव येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेणार आहे. सामाजिक बांधिलकीची भावना जपत शिक्षक गावोगावी काम करत असतात. नुकतीच अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेलेली वरुर तालुका शेवगाव येथील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली-सदिच्छा मंडळाने दत्तक घेणार असून या शाळेला पुन्हा उभे करण्यासाठी जे जे शैक्षणिक साहित्य आवश्यक असेल ते सर्व आम्ही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.