Anand Bhandari : दिव्यांग कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद; आनंद भंडारी

Anand Bhandari : दिव्यांग कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद; आनंद भंडारी

0
Anand Bhandari : दिव्यांग कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद; आनंद भंडारी
Anand Bhandari : दिव्यांग कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद; आनंद भंडारी

Anand Bhandari : नगर : दिव्यांग कर्मचारी (Divyang) शारीरिक अडचणींवर मात करून आपापल्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत चांगले काम कसे करावे, हे त्यांच्याकडून शिकावे. दिव्यांगांना सहानुभूतीची नाही तर संधीची आवश्यकता आहे. धडधाकट व्यक्ती पेक्षा दिव्यांग चांगलं काम करीत आहेत. बेरोजगार दिव्यांगांसाठी राज्य केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari) यांनी केले.

अवश्य वाचा : शिर्डीत एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान

दिव्यांग गुणवंतांचा पुरस्कार सोहळा

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या दिव्यांग गुणवंत पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकारी योगेश पैठणकर, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दशरथ दिघे, ॲड. सुभाष भोर माजी सभापती रामदास भोर, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, संजय धामणे, संतोष दुसुंगे, सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे, अर्जुन शिरसाट, बाबासाहेब खरात आदी उपस्थितीत होते.

नक्की वाचा : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

यावेळी भंडारी म्हणाले, (Anand Bhandari)

आपले प्रश्न हे आमचे प्रश्न आहेत, दिव्यांगांची वारंवार तपासणी होणार नाही. यासाठी तालुकास्तरीय कमिटी स्थापन करून दिव्यांगांची तपासणी केली आहे. लाक्षणिक दिव्यांगांची पुन्हा पुन्हा तपासणी होणार नाही, असे आश्वासित केले. साहेबराव अनाप यांनी दिव्यांगांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले, खऱ्या दिव्यांगांची वारंवार तपासणीतून सुटका व्हावी, दिव्यांगाना साधने उपकरणे उपलब्ध व्हावीत, दिव्यांग शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार देण्यात यावा आदी मागण्या मांडल्या.

यावेळी शिक्षणाधिकारी पाटील भास्कर पाटील म्हणाले, दिव्यांगांना भावनिकतेची गरज नसून त्यांना मुख्य प्रवाहात संधी देण्याची गरज आहे. त्यांच्यात सर्वसमावेशक नेतृत्व गुण असतात. दिव्यांग हे इतरांपेक्षा अधिक चांगलं काम करतात. दिव्यांगांना योग्य दिशा दिली तर त्यांच्या आयुष्यात दशा येणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड काढण्याबाबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, योगेश पैठणकर, ॲड. सुभाष भोर, रामदास भोर यांनी मनोगत व्यक्त केले. तर वैशाली शेळके, ज्योती जाधव, रोहिणी शिंदे, संजय ठोकळ, विठ्ठल मान्हेरे, जिजाबाई बनकर, अमोल कडू, मंगल वामन, हिराबाई लटांबळे, मेहबूब शेख, एकनाथ साबळे, रुपेश वाणी, अशोक दांगडे, अलका शिंदे, ज्योती तवले, संदीप आदमाने, कादर शेख, बाळू चेमटे यांना पुरस्काराने सन्मानित केले.


राजू आव्हाड, पोपटराव धामणे, राजेंद्र औटी, श्रीकांत दळवी, बन्सी गुंड, राजेंद्र ठूबे, साहेबराव मले, किरण माने, शिवाजी आव्हाड, सुखदेव ढवळे, विजय अंधारे, मिठू शिंदे, सचिन रनाते, अजय लगड आदींनी परिश्रम घेतले.