Anand dham : नगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचे सुशिष्य तथा अर्हम विज्जा प्रणेता पूज्य उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी म. सा. गुरुवार (ता. २) ते शनिवार (ता. ४) मे राेजी नगरला येणार आहेत. तीन दिवस त्यांचे आनंदधामच्या पवित्र प्रांगणात विहार असणार आहे. श्रावक श्राविकांना त्यांच्या सान्निध्याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आयोजक नरेंद्र फिरोदिया व सुनील मुनोत यांनी दिली.
दर्शनाचा भाविकांना लाभ
गुरूवार (ता. २) रोजी सकाळी ७.३० वाजता पू. प्रवीणऋषीजी म. सा. यांचे यश पॅलेस चौकात आगमन आणि स्वागत होईल. यानंतर सकाळी ८.१५ वाजता आनंदधाम येथे त्यांची गुरुभक्ती विषयावर धर्म सभा होणार आहे. दुपारी २ ते ४ यावेळेत त्यांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येईल. सायंकाळी ४.३० ते ५.३० यावेळेत ते महिलांना ‘आवो रसोई घर को मंदिर बनाये’ याविषयी मार्गदर्शन करतील. रात्री ८ ते ९ यावेळेत आज और कलकी चुनौती या विषयावर त्यांचे प्रवचन होणार आहे. यात १५ मिनिटे प्रश्नोत्तरे असतील.
शुक्रवार (ता. ३) रोजी सकाळी ८.३० ते ९.३० यावेळेत दान, धर्म आणि व्यवस्था या विषयावर त्यांचे प्रवचन होणार आहे. यानंतर गौतम निधी कलश संकलन आणि गौतम निधी कलश वितरण कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ ते ४ यावेळेत त्यांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येईल. सायंकाळी ४.३० ते ५.३० यावेळेत महिला भगिनींना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. यावेळी ‘आवो रसोई घर को मंदिर बनाये’ याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. रात्री ८ ते ९ यावेळेत स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर त्यांचे प्रवचन होणार आहे. यात १५ मिनिटे प्रश्नोत्तरे असतील.
शनिवार (ता. ४) रोजी सकाळी ८.३० ते १० यावेळेत ‘मेरा परिवार मेरी ताकद’ या विषयावर प्रवचन होणार आहे. दुपारी ४ ते ५ यावेळेत पूज्य प्रवीणऋषीजी म. सा. यांचा कृतज्ञता समारंभ होणार आहे. पूज्य प्रवीणऋषीजी म. सा. बऱ्याच कालावधीनंतर नगरला आचार्यश्रींच्या भूमीत आनंदधाम येथे येत आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तीन दिवस त्यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन भाविकांना मिळणार आहे. या कार्यक्रमांना श्रावक श्राविकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पूज्य प्रवीणऋषीजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.