Anand Pimpalkar:आनंद पिंपळकर दिसणार कृष्णशास्त्री पंडित यांच्या भूमिकेत

0
Anand Pimpalkar:आनंद पिंपळकर दिसणार कृष्णशास्त्री पंडित यांच्या भूमिकेत
Anand Pimpalkar:आनंद पिंपळकर दिसणार कृष्णशास्त्री पंडित यांच्या भूमिकेत

नगर : सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर (Anand Pimpalkar) यांनी वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ते एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी सज्ज झाले आहेत. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ (Dharmrakshak Mahaveer Chatrapati Sambhaji Maharaj) या आगामी मराठी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारणार आहेत.

नक्की वाचा : झालोया मी पैलवान अख्या महाराष्ट्राची शान’,बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणं प्रदर्शित

कृष्णशास्त्री पंडिताच्या भूमिकेमध्ये आनंद पिंपळकर  (Anand Pimpalkar)

धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपली आहुती दिली. त्या अनेक अनामिक व्यक्तींपैकी एक जंजिऱ्याचे हनुमान भक्त व छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक कृष्णशास्त्री पंडित. या कृष्णशास्त्री पंडिताच्या  भूमिकेमध्ये आपल्याला आनंद पिंपळकर दिसणार आहेत. यात अमृता खानविलकर आणि ठाकूर अनुप सिंग यांच्या समवेत अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल . उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील प्रस्तुत, तुषार शेलार दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

अवश्य वाचा : मोठी बातमी!शंकरराव गडाख यांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस

आनंद पिंपळकर काय म्हणाले ? (Anand Pimpalkar)

आपल्या भूमिकेविषयी बोलताना आनंदजी सांगतात, ‘आजवर बऱ्याच भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील कृष्णशास्त्री पंडित ही भूमिका माझ्यासाठी विशेष आहे. पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव करणाऱ्या या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटातल्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेचा भाग होता आल्याचं खूप समाधान आहे. वेगळेपण व विशेष लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे, प्रेक्षकांना ती नक्की आवडेल अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here