Anand Rishiji : मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत आनंदऋषीजी म. सा.; आचार्यांच्या अभिवादनासाठी देशभरातील भाविक नगरमध्ये

Anand Rishiji : सर्वाभूती परमेश्वर आहे, असे समजून साधकाचे हीत जोपासणारे राष्ट्रसंत आनंदऋषीजी म. सा. हे केवळ जैन समाजाचे संत नसून ते सर्वधर्माचे राष्ट्रीय संत होते.

0
Anand Rishiji

Anand Rishiji : नगर : सर्वाभूती परमेश्वर (God) आहे, असे समजून साधकाचे हीत जोपासणारे राष्ट्रसंत आनंदऋषीजी (Anand Rishiji) म. सा. हे केवळ जैन समाजाचे (Jain society) संत नसून ते सर्वधर्माचे राष्ट्रीय संत होते, असे मत महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : अमरावतीमधून भाजपकडून नवनीत राणाचं नाव जाहीर; स्वपक्षीयांचा विरोध डावलून संधी

Anand Rishiji

आनंदऋषीजींचे विचार अत्यंत जीवनवादी आहेत. देह नश्वर असताे, पण गुण शाश्वत असतात. गुणांनी सालंकृत हाेऊन जाे संसार करताे. त्याला उत्तम प्रतिचा आनंद सदा सर्वकाळ प्राप्त हाेताे. ते त्यांचे विचारधन आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म. सा. यांच्या ३२ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आज शहरातील धार्मिक परीक्ष बाेर्ड आनंदधाम येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. मानवसेवेची शिकवण देणाऱ्या आचार्य आनंदऋषीजी म. सा. यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करण्यासाठी देशभरातून भाविक नगरमध्ये दाखल झाले आहेत.

अवश्य वाचा : प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आचार्यश्रींच्या जीवनावर प्रवचन (Anand Rishiji)

जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनाेत, सचिव संताेष बाेथरा म्हणाले, सकाळी ७ वाजता जैन स्थानक येथून शांतीमार्च काढण्यात आला. नगर शहरातील प्रमुख मार्गावरुन जात आनंदधाम येथे शांतीमार्चचा समाराेप करण्यात आला. सकाळी ९ वाजता गुणगाैरव सभा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज, प्रबुद्ध विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज, राष्ट्रसंत कमलेशमुनी म. सा., पूज्य आलाेकऋषीजी महाराज आदिठाणा, महासतीजी महाराष्ट्र प्रवर्तिनी डाॅ. ज्ञानप्रभाजी म. सा. आदी साधू साध्वीजी यांंनी उपस्थित राहून आचार्यश्रींच्या जीवनावर प्रवचन दिले. यानंतर व्यापारी मित्र मंडळाच्यावतीने केशर गुलाब मंगल कार्यालयात गाैतमप्रसादीची व्यवस्था करण्यात आली हाेती.

Anand Rishiji

रक्तदान शिबिराचे आयाेजन (Anand Rishiji)

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आनंदधाम नजीकच्या भक्तनिवास येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. यात दाेन हजार रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे नवीपेठ येथे सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत महाभाेजन आयाेजित करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता आनंदधामच्या प्रांगणात आभास व श्रेयस जाेशी यांची भक्ती संध्या हाेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here