Anandacha Shida:मोठी बातमी!आनंदाचा शिधा योजना अखेर बंद 

0
Anandacha Shida:मोठी बातमी!आनंदाचा शिधा योजना अखेर बंद 
Anandacha Shida:मोठी बातमी!आनंदाचा शिधा योजना अखेर बंद 

Anandacha Shida : राज्य सरकारची लोकप्रिय असलेली आनंदाचा शिधा योजना (Anandacha Shidha Scheme) आता बंद (Closed) करण्यात आली आहे.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या माध्यमातून सणाच्या दिवशी राज्यातील १ कोटी ६३ लाख लोकांना याचा लाभ मिळत होता. राज्यातील तिजोरीमध्ये असलेल्या खडखडाटीमुळे ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा आहे.

नक्की वाचा : आता जेजुरीतील खंडेरायाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड लागू!

आनंदाचा शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होतं. ही योजना आता बंद करण्यात आली आहे.नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला काहीशी बगल दिल्याचे दिसून आले होते. माध्यमांनी यासंदर्भात आधी बातम्या देखील देण्यात आल्या होत्या. मात्र आता त्यावर  शिक्कामोर्तब झालं आहे. या योजनेच्या माध्यमातून दसरा, दिवाळी, गुढीपाडवा,आंबेडकर जयंती अशा सणांच्या निमित्ताने फक्त १०० रुपयांमध्ये पाच वस्तू दिल्या जायच्या.

अवश्य वाचा : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं स्मारक ‘या’ ठिकाणी उभारलं जाणार

योजना बंद करण्यामागचं कारण गुलदस्त्यात (Anandacha Shida)

मागील निवडणुकीत महायुतीकडून अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांना निधीचं वाटप करण्यात आलं आहे. त्यामध्ये आनंदाचा शिधा या योजनेसाठी कोणतीही तरतूद झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आनंदाचा शिधा ही योजना आता बंद झाल्याचं स्पष्ट आहे.

लाडकी बहीण योजनेचा फटका?(Anandacha Shida)

आनंदाचा शिधा योजना बंद होण्यामागे निश्चित असं कारण समोर आलं नाही. तरीही राज्यात लाडकी बहीण योजनेचा फटका या योजनेला बसला असल्याची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेला देण्यात आलेल्या निधीमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असून पुढेही अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आनंदाचा शिधा ही योजना राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली होती. त्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र आता ही योजनाच बंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here