Anandrishiji : आनंदधाममध्ये उद्या आत्म ध्यान धर्मयज्ञाचे आयोजन

Anandrishiji : आनंदधाममध्ये उद्या आत्म ध्यान धर्मयज्ञाचे आयोजन

0
Anandrishiji : आनंदधाममध्ये उद्या आत्म ध्यान धर्मयज्ञाचे आयोजन
Anandrishiji : आनंदधाममध्ये उद्या आत्म ध्यान धर्मयज्ञाचे आयोजन

Anandrishiji : नगर : आचार्य प. पू. श्री आनंदऋषीजी (Anandrishiji) म. सा. यांचे सुशिष्य आणि महाराष्ट्र प्रवर्तक महाश्रमण पूज्य श्री कुंदनऋषिजी (Shri Kundan Rishiji Maharaj) म.सा. यांच्या ९२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने आनंदधामच्या (Ananddham) पावन भूमीवर “आत्मध्यान धर्मयज्ञ” या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : “वंदे मातरम” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त संगमनेरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन

ध्यानमार्गाच्या साधनेचा दिव्य संगम

या भव्य यज्ञाचे नेतृत्व युगप्रधान, आचार्य सम्राट, ध्यानयोगी डॉ. पू. श्री शिव मुनी जी म. सा. यांच्या पावन सान्निध्यात होणार आहे. हे आत्मध्यान धर्मयज्ञ रविवारी (ता ९) रोजी सकाळी ६:३० ते ९:३० या वेळेत आनंदधाम येथे पार पडणार आहे. हा आत्मध्यान धर्मयज्ञ म्हणजे केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, आत्मचिंतन, अंतर्मन शुद्धी आणि ध्यानमार्गाच्या साधनेचा दिव्य संगम आहे. या यज्ञातून साधकांना अंतर्मनातील शांतता, संयम आणि समाधीची अनुभूती मिळणार आहे. श्रमण संघाच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि अध्यात्मिक चेतनेचे संवर्धन हाच या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

नक्की वाचा : वाडियापार्कमध्ये ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

सर्वांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन (Anandrishiji)

या आत्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक भाविकांनी आपली नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर सर्वांना कार्यक्रमस्थळी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ध्यान आणि मौन साधनेसाठी योग्य वातावरण राखून हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद कटारिया, पारस गुंदेचा, सचिन भळगट, छाया मुथा, मोना चोपडा, डॉ. सपना गुगळे परिश्रम घेत आहे.