
Anandrishiji Maharaj : नगर : राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य आनंदऋषीजी महाराज (Anandrishiji Maharaj) यांच्या ३४ व्या पुण्यस्मृती निमित्त जैन सोशल फेडरेशनच्यावतीने (Jain Social Federation) आनंदधामच्या प्रांगणात प्रबुद्ध विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने भगवान महावीर (Bhagwan Mahavir) व्याख्यानमाला २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. (ता. २१) ते (ता. २७) मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता व्याख्यानमाला होईल. व्याख्यानमालेचे मुख्य प्रायोजक विजयकुमार मुनोत यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्रीमती इमरतबाई मुनोत (नेवासावाला) परिवार आहे.
नक्की वाचा : पाणी आरक्षण व आवर्तनावरून निळवंडे कृती समिती आक्रमक; अधिकाऱ्यांना निवेदन
बोधनात्मक आणि वैचारिक मेजवानी नगरकरांना मिळणार
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन तर्फे दरवर्षी भगवान महावीर व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यात सहभागी होऊन विविध विषयावर विचार व्यक्त करत असतात. यंदाही अशीच प्रबोधनात्मक आणि वैचारिक मेजवानी नगरकरांना मिळणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन (Anandrishiji Maharaj)
या विषयावर व्याख्यान होईल. रविवार (ता. २२) मार्चला अकोला येथील फडके ॲकॅडमीचे संचालक सतीश फडके यांचे ‘तुमचे आमचे आध्यात्म’ या विषयावर व्याख्यान होईल. सोमवार (ता. २३) मार्चला निवेदिका तथा समुपदेशक क्षिप्रा मानकर यांचे ‘समाज परिवर्तनात महिलांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवार (ता. २४) मार्चला लेखक तथा प्रेरणादायी वक्ते युवराज पाटील यांचे ‘अस्वस्थ वर्तमान आणि आपली भूमिका’ या विषयावर व्याख्यान होईल.
बुधवार (ता. २५) मार्चला पुणे येथील प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ केदार वाळिंबे यांचे ‘फिअर ऑफ मिसिंग आऊटच्या पलिकडचे पालकत्व’ या विषयावर व्याख्यान होईल. गुरूवार (ता. २६) मार्चला प्रसिद्ध वक्ते वैभव ढूस यांचे ‘आत्मविश्वासाने प्रगती” या विषयावर व्याख्यान होईल. शुक्रवार (ता. २७) मार्चला व्याख्यानमालेची सांगता प्रसिद्ध वक्ते, युवा मार्गदर्शक ओंकार दाभाडकर यांच्या ‘यशातील अडसर: आपला मेंदू’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. आनंदधाम येथे आयोजित या व्याख्यानामालेला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जैन सोशल फेडरेशनने केले आहे.


