नगर : सध्या देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav)उत्साह पहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात मुंबईच्या लालबागच्या राजाचा(Lalabagcha Raja)थाटचं काही न्यारा आहे. आता या प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती मंडळाने अनंत अंबानी (Anant Ambani) यांची कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. एक महिन्यापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली.
नक्की वाचा : ‘त्या सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज’;शरद पवारांचे सूचक विधान
अनंत अंबानींची सामाजिक कार्यात महत्वाची भूमिका (Anant Ambani)
अनंत अंबानी यांचा या मंडळाशी पंधरा वर्षांपासून जोडले गेले आहेत. त्याच काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतला आहे. लालबागचा राजा मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात मिळालेल्या दानातून अनेक सामाजिक कामे केली आहेत. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत, फंड कमी झाल्यामुळे मंडळाचे कार्य थांबले होते. त्यावेळी, अनंत अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने या मंडळाला पाठींबा दिला आणि त्यासाठी त्यांनी रुग्ण सहाय्य निधी योजनेसाठी योगदान दिले. अंबानींच्या रिलायन्स फाउंडेशनने २४ डायलेसिस मशीन मंडळाला दिली. ज्यामुळे मंडळाच्या कार्यात मोठी मदत झाली.
अवश्य वाचा : झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला!
अनंत अंबानींचा विशेष सन्मान (Anant Ambani)
लालबागचा राजा सल्लागार समितीत अनेक पूर्व अध्यक्ष आणि राजकीय पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. अनंत अंबानी यांच्या कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्तीवर मंडळाच्या सदस्यांनी समाधानी व्यक्त केले. त्यांच्या कुटुंबाने मंडळाच्या चॅरिटेबल अॅक्टिव्हिटीजमध्ये मोठे योगदान दिले आहे. ज्येष्ठ पत्रकार किरण नबर यांना देखील ही सदस्यता प्रदान करण्यात आली होती. परंतु त्यांच्या निधनानंतर अशा प्रकारच्या सदस्यता देण्याची परंपरा थांबली होती.आता अनंत अंबानी यांना ही सदस्यता देण्यात आली आहे.मंडळाने अनंत अंबानी यांची सन्मानात्मक सदस्यता दरवर्षी सामान्य सभेच्या मंजुरीने पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या योगदानामुळे मंडळाच्या कार्यात सतत प्रगती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.