Anasuya Sengupta:भारताच्या अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास; कान्समध्ये मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 

कोलकातामध्ये राहणाऱ्या अनसूया सेन गुप्ताने प्रोडक्शन डिझायनर म्हणून आपली लोकप्रियता मिळवली आहे. २००९ मध्ये बंगाली चित्रपटांच्या माध्यमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

0
Anasuya Sengupta
Anasuya Sengupta

नगर : ‘कान्स फिल्म फेस्टिवल २०२४’ (Cannes Film Festival 2024) सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातील अनेक अभिनेत्री सहभागी झाल्या आहेत. आता ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये भारताच्या अनसूया सेनगुप्ताने (Anasuya Sengupta) मोठा इतिहास रचला आहे. कोलकातात राहणाऱ्या अनसूया सेनगुप्ताला ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

नक्की वाचा : विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार ‘या’ दिवशी लागणार

‘कान्स फेस्टिव्हल’मध्ये पुरस्कार पटकावणारी अनसुया पहिली भारतीय ठरली आहे. तिला ‘शेमलेस’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. अनसूया सेनगुप्ताच्या या यशानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अनसूया सेनगुप्ताने कोणाला समर्पित केला आपला अवॉर्ड ? (Anasuya Sengupta)

अनसूया सेनगुप्ताने ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचं नाव काढलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. ‘शेमलेस’ या चित्रपटात अनसूया सेन गुप्ताने एक सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. ‘शेमलेस’ हा चित्रपट बुल्गारियाचे सिनेनिर्माते कॉन्स्टेंटिन बोजानो यांनी दिग्दर्शित केला आहे. अनसूयाने हा पुरस्कार जगभरातील LGBT समुदायाला समर्पित केला आहे.

अवश्य वाचा : सनरायजर्स हैदराबादची फायनलमध्ये धडक;राजस्थानला हरवले  

अनसूया सेनगुप्ताचा प्रवास (Anasuya Sengupta)

कोलकातामध्ये राहणाऱ्या अनसूया सेन गुप्ताने प्रोडक्शन डिझायनर म्हणून आपली लोकप्रियता मिळवली आहे. २००९ मध्ये बंगाली चित्रपटांच्या माध्यमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनसूया मुंबईत शिफ्ट झाली. मुंबईत तिचा भाऊ अभिषेक सेनगुप्ता चित्रपटांमध्ये काम करायचा. तिला अभिनयासाठी जास्त विचारणा झाली नाही. त्यानंतर ती आर्ट डिपार्टमेंटमध्ये ती जोडली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here