Andhra Pradesh Stampede:आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी;९ जणांचा मृत्यू     

0
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी;९ जणांचा मृत्यू     
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी;९ जणांचा मृत्यू     

नगर : कार्तिक महिन्यातील एकादशीच्या शुभ मुहूर्तावर एक मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील(Andrapradesh) श्रीकाकुलम जिल्ह्यात काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात (Venkateshwara Swami Temple) झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत (Stampede) नऊ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झालेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

नक्की वाचा:  राज ठाकरेंचा ‘सत्याचा मोर्चा’ नेमका कशासाठी ?  

नेमकं काय घडलं ? (Andhra Pradesh Stampede)

समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशी निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरातील प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली. भाविक शिडीवरुन वर मंदिरात जात असताना चेंगराचेंगरी झाली. यावेळी गोंधळ होऊन अनेक भाविक एकमेकांवर कोसळले. यात गर्दीखाली दबून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची पथकं आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अवश्य वाचा:  कपाळी कुंकू आणि दैवी तेज;’महाकाली’ची पहिली झलक प्रदर्शित   

या घटनेनंतर राज्याचे कृषी मंत्री के.अचन्नायडू मंदिरात पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मंदिर अधिकाऱ्यांची भेट घेतली. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आलं आहे.

चेंगराचेंगरीमुळे झालेली हानी अत्यंत दुःखद (Andhra Pradesh Stampede)

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले की, “श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो. मी अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.”