Anganwadi Worker : नेवासा: तालुक्यातील अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker), मदतनीस आशा वर्कर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता.९) दुपारी नेवासा (Newasa) तहसीलवर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत सरकारने (Government) मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध व्यक्त केला. भारत बंदच्या कामगारांच्या संपात सहभाग नोंदवून अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा वर्कर या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. “मानधन नको वेतन हवे”ची मुख्य मागणी याप्रसंगी करण्यात आली.
नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू
प्रश्न सुटेपर्यंत लढण्याचा निर्धार
नेवसा पंचायत समितीसमोर अगोदर विविध मागण्यांच्या संदर्भात घोषणाबाजी केल्यानंतर सर्व अंगणवाडी सेविका मोर्चाने नेवासा तहसीलदार कचेरीवर गेल्या. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे मार्गदर्शक कॉ. कामगार नेते बाबा आरगडे, स्मिता पानसरे, अंगणवाडी मदतनीस कर्मचारी संघटनेच्या नेवासा तालुका अध्यक्षा मन्नाबी शेख यांनी केले.
घोषणाबाजी करत सदरचा मोर्चा नेवासा तहसील कचेरीवर आल्यानंतर मन्नाबी शेख यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी केली. तर कॉ. बाबा आरगडे व स्मिता पानसरे यांनी देखील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्या या रास्त असून त्यासाठी आम्ही अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, त्यासाठी हा लढा प्रश्न सुटेपर्यंत लढत राहू, असा निर्धार यावेळी बोलतांना केला.
अवश्य वाचा : पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश
शेतकरी, कष्टकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी (Anganwadi Worker)
यावेळी झालेल्या मोर्चाप्रसंगी निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना पाठवून आपल्या निवेदनाचा अहवाल पाठवला जाईल, असे सांगितले. यावेळी झालेल्या मोर्चाप्रसंगी भारतीय किसान सभेचे कॉ. आप्पासाहेब वाबळे, अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्षा मन्नाबी शेख, माया जाजू, अलका दरदंले, मंदाताई निकम, चंद्रकला विटेकर, स्वाती हिवाळे, कॉ.लक्ष्मण कडू पाटील, कॉ.भारत आरगडे, कॉ. बाबासाहेब सोनपुरे यांच्यासह अंगणवाडी, सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शेतकरी, कष्टकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.