Anganwadi Worker : अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेत धरणे

Anganwadi Worker : अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेत धरणे

0
Anganwadi Worker : अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेत धरणे
Anganwadi Worker : अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेत धरणे

Anganwadi Worker : नगर : पोषण ट्रेकर ॲपद्वारे (Poshan Tracker app) टीएचआर वाटप करताना फेस रिकगनायझेशन सिस्टिममुळे (Face Recognition System) गोंधळ उडाला आहे. निकृष्ट आहार, वेतनश्रेणी, महागाई भत्ता व मानधन वाढच्या प्रश्‍नासंदर्भात अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker) मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली.

नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा मोठ्या संख्येने सहभाग

या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, अध्यक्षा मदिना शेख, सहचिटणीस जीवन सुरडे, माया जाधव, सविता दरंदले, मन्नाबी शेख, निर्मला चांदेकर, भगीरथी पवार, शोभा पवार, रतन गोरे, अलका दरंदले, शोभा विसपुते, सुनीता बोर्डे, सुनीता कुंडारे, संगीता विश्‍वास, शशिकला औटी, सुनीता पवार, शोभा विसपुते, अलका दरंदले, शोभा येवले, भारती बोरुडे, प्रतिभा जोशी आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

अवश्य वाचा : पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध: विखे पाटील

पोषण ट्रॅकर ॲप वाटपरण्यामध्ये अनेक अडचणी (Anganwadi Worker)

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे सहा महिने ते तीन वर्षे या वयोगटातील लाभार्थ्यांना टीएचआर वाटप केला जातो. या अगोदर पालकांचे रजिस्टर सह्या घेऊन टीएचआर वाटप केला जात होता, परंतु आता दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत पोषण आहार फेस रिकगनायझेशन सिस्टिममुळे त्याचे वाटप करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार एप्रिल २०२५ या महिन्यात राज्यातील अंगणवाडी सेविकांनी पोषण ट्रॅकर ॲप मध्ये फेस रिकगनायझेशन सिस्टिममुळेद्वारे टीएचआर वाटप करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी टीएचआर वाटप करणे अशक्य झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी याना देण्यात आले आहे.