Anil Deshmukh:’आम्ही सगळयांनाच पक्षात घेणार नाही,थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य’- अनिल देशमुख 

0
Anil Deshmukh
Anil Deshmukh

Anil Deshmukh : ज्या पद्धतीने अनेक मतदारसंघातले इच्छुक लोक आमच्या पक्षांमध्ये येत आहेत. पवार साहेबांच्या (Sharad Pawar) नेतृत्वाकडे पाईप लाईन लागली आहे. आमच्या पक्षामध्ये जे आम्हाला सोडून गेलेत त्याच्यातले सुद्धा काही नेते परत येण्यासाठी इच्छुक आहेत. पण आम्ही सगळयांनाच पक्षात घेणार नाही. त्याच्यामुळे आम्ही थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य आहे, कोण नाही. कोणी मधल्या काळामध्ये जास्त तोंड उघडलेत, आमच्या पक्षातून गेल्यानंतर काय काय झालं, हे सर्व पाहून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे मत राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. ते भंडारा येथे बोलत होते.

नक्की वाचा :  शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेंवर गुन्हा दाखल

‘विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा’ (Anil Deshmukh)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा ही हक्काची आहे. यावरील दावा सोडणार नसल्यानं इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचाचं उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहील. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिले.

अवश्य वाचा : वाहतूक नियमांचे काटेकाेर पालन करा; पाेलीस प्रशासनाचे आवाहन

‘राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार’ (Anil Deshmukh)

विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये लागायला पाहिजे होत्या. भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष हे निवडणुका घ्यायला घाबरतात. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना भीती वाटत आहे.  निवडणुका कशा घ्यायच्या. जेव्हा केव्हा निवडणुका महाराष्ट्रात होतील तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या तीन जागांवर आमचा दावा राहील आणि तो आम्ही आग्रही मागणी राहील. या जागा आम्ही सोडणार नाही. तुमसर विधानसभा ही जागा आमची हक्काची आहे आणि ती सोडणार नाही. नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याबाबत मी चर्चा ऐकली नाही,असं म्हणत अनिल देशमुख यांनी या प्रश्नावर देणे टाळले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here