Anil Kapoor : अनिल कपूरचा ‘फायटर’ सिनेमातील लूक आऊट

अनिल कपूरचा यांचा फायटर सिनमेतील धमाकेदार लूक आऊट झाला आहे. या सिनेमात ते कॅप्टन जय सिंह उर्फ रॉकीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

0
अनिल कपूरचा 'फायटर' सिनेमातील लूक आऊट

नगर : अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आगामी ‘फायटर’ (Fighter) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील त्याचा लूक आऊट झाला आहे. आता या सिनेमातील अभिनेता अनिल कपूरचा (Anil Kapoor) धमाकेदार लूक आऊट झाला आहे. अनिल कपूर सध्या ‘अॅनिमल’ (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहे.

नक्की वाचा : सत्यजित तांबेंचा ‘पुस्तक तुला’ करून सन्मान

‘फायटर’ या सिनेमात अनिल कपूर कॅप्टन जय सिंह उर्फ रॉकीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील त्यांचा दमदार आणि लूक आता प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अनिल कपूरने त्यांचा जा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनिल कपूर हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. उमेश मेहरा यांच्या ‘हमारे तुम्हारे’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. 

अवश्य वाचा : ‘आशुतोष काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू’ – राधाकृष्ण विखे पाटील

‘फायटर’ या बहुचर्चित सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंद यांनी सांभाळली आहे. या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा २५ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अनिल कपूरच्या चाहते आता त्यांच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here