Anil Mohite : नगर : व्यापारी वर्ग कायम भाजपच्या (BJP) मागे ठामपणे उभा असतो. म्हणूनच दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता तीन वेळा खासदार (MP) झाले. भाजपच्या व्यापारी आघडीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेत व्यापारी वर्गाला समाजकंटकांपासून त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. व्यापारी आघाडीने केलेल्या कामाची दखल पक्ष नक्कीच घेईल, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite) यांनी केले.
नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार
नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र
भाजप शहर व्यापारी आघाडीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी शहराध्यक्ष महेंद्र गंधे, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी व वसंत लोढा, सरचिटणीस महेश नामदे व निखिल वारे, प्रदेश सदस्या गीता गिल्डा, माजी उपमहापौर मालन ढोणे, अशोकराव गायकवाड, बाबासाहेब सानप, ज्योती दांडगे, प्रिया जानवे, युवा मोर्चाचे अध्यक्ष रुद्रेश अंबाडे, व्यापारीं आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे, सरचिटणीस हर्षल बोरा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आवश्य वाचा : सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च
व्यापारी वर्गाला त्रास होताकामा नव्हे यासाठी उपाययोजना (Anil Mohite)
भाजपचे पदाधिकारीही शहरातील व्यापारी वर्गाच्या मागे उभे राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समक्ष शहरातील व्यापारी वर्गाला कोणताही त्रास होताकामा नव्हे; यासाठी उपाययोजना राबवा, असे मनापा आयुक्तांना ठणकावून सांगितले आहे. यावेळी महेश गुगळे म्हणाले, शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाची व्यापारी आघाडी सक्रियपणे काम करत व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पक्षाचे केलेल्या कामाची दखल घेत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत व्यापारी आघाडीचा विचार करावा, अशी मागणी केली. यावेळी महेंद्र गंधे, वसंत लोढा, निखील वारे आदींनी मनोगत व्यक्त करून व्यापारी आघाडीचे कौतुक केले. उपाध्यक्ष प्रशांत बुऱ्हाडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्शल बोरा यांनी केले. सरचिटणीस लक्ष्मिकांत तिवारी यांनी आभार मानले.
यावेळी मंडल अध्यक्ष सचिन जाधव, मयूर बोचूघोळ, ज्ञानेश्वर काळे, धनंजय जाधव, गोपाल वर्मा, प्रशांत मुथा, गणेश विद्दे, वैभव सुरवसे, नितीन शेलार, शशिकांत कुलकर्णी, लीला अग्रवाल, व्यापारी आघाडीचे नूतन उपाध्यक्ष रुपेश वर्मा, प्रशांत डहाळे व सुरेश लालबागे, सरचिटणीस निरज राठोड, चिटणीस संजय कांगला, दिनेश तलरेजा, महेंद्र नांदुरकर व दीपक धेरेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.