Ankush Chattar Murder Case : अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीची पोलीस संरक्षणाची मागणी

Ankush Chattar Murder Case : अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीची पोलीस संरक्षणाची मागणी

0
Ankush Chattar Murder Case

Ankush Chattar Murder Case : नगर : खटल्यांमधून नाव मागे घेण्यासाठी वारंवार धमक्या (Threat) दिल्या जात असल्याचा आरोप करत अंकुश चत्तर खून (Ankush Chattar Murder Case) प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब सोमवंशी याने स्वत: व चत्तर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण (Police protection) देण्याची मागणी पोलीस (Police) प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन त्याने पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे दिले आहे.

नक्की वाचा: आसाम सरकारचा मोठा निर्णय; नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

न्यायालयात येऊन दमदाटी (Ankush Chattar Murder Case)

अंकुश चत्तर खून प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, जिल्हा न्यायालयात हा खटला चालवला जात आहे. निवेदनात म्हटले आहे की, आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २४ जुलै २०२३ रोजी जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे खटला इतरत्र कोणत्याही न्यायालयात व इतर न्यायाधीशांसमोर चालविण्याबाबत अर्जही केला आहे. त्यानंतर हा अर्ज मागे घेण्यासाठी मला आरोपीच्या भावाने न्यायालयात येऊन दमदाटी केली. त्यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे १३ ऑगस्ट रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

Ankush Chattar Murder Case

अवश्य वाचा: पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

खटल्यातून नावे मागे घेण्यासाठी धमकी (Ankush Chattar Murder Case)

खटल्याची तारीख आज (ता. ३१) जिल्हा न्यायालयात असून, या तारखेला सुद्धा या व्यक्तींकडून खटल्यातून नावे मागे घेण्यासाठी मला, माझ्या घरच्यांना व मयत अंकुश चत्तर यांच्या घरच्यांना धमकाविणे अथवा जीवाचे बरे-वाईट होऊ शकते. हे व्यक्ती न्यायालयात येऊन दमदाटी करतात. अंकुश चत्तर यांच्या घरच्यांनाही दमदाटी व इतर प्रकारे या खटल्यातून माघार घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत असल्याचे फिर्यादी सोमवंशी यांनी म्हंटले आहे. तर खून प्रकरणातील आरोपींच्या जवळच्या व्यक्तींकडून संरक्षण मिळण्यासाठी तत्काळ पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.