Ankush Chaudhari: मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि ‘स्टाईल आयकॉन’ (Style Icon) म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी (Actor Ankush Chaudhari). अंकुश आता वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने ‘महादेव’च्या संपूर्ण टीमने ‘पी.एस.आय.अर्जुन चित्रपटातील (PSI Arjun Movie) नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करून अंकुशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नक्की वाचा : ‘धनंजय मुंडे गुन्हेगार नाही,मी त्यांच्या पाठीशी’-नामदेव शास्त्री
अंकुश चौधरीचा ‘पी.एस.आय.अर्जुन चित्रपटातील लूक प्रदर्शित (Ankush Chaudhari)
‘पी.एस.आय.अर्जुन चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक दिसत आहे. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रीम विव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत. तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. यापूर्वी प्रेक्षकांनी अंकुशला रोमँटिक,ॲक्शन हिरोच्या अंदाजात पाहिले आहे. मात्र या चित्रपटात अंकुश एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार हे समोर आले नसले तरी लवकरच याबद्दलची माहिती प्रेक्षकांसमोर येणार आहे.
अवश्य वाचा : बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण
चित्रपटाचे निर्माते विक्रम शंकर म्हणाले की… (Ankush Chaudhari)
चित्रपटाचे निर्माते विक्रम शंकर म्हणतात,“या चित्रपटाच्या माध्यमातून मी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. यापूर्वी मी विविध भाषेत चित्रपटांची निर्मिती केली आहे. परंतु मला मराठीबद्दल नेहमीच कौतुक राहिले आहे. मुळात मराठी प्रेक्षक जाणकार आहेत. त्यांना वैविध्यपूर्ण विषय आवडतात. हा विषयही खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाची निवड केली. त्यात अंकुश चौधरीसारखा प्रतिभावान अभिनेता या चित्रपटाला लाभला आहे, त्यामुळे हा एक उत्तम योग जुळून आला आहे.अंकुश मराठीतील एवढा मोठा अभिनेता असूनही त्याचे आम्हाला खूप सहकार्य लाभले.आज आमच्या संपूर्ण टीमकडून ही त्याला वाढदिवसाची भेट.’’