Ankush Darade : नगर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती (Reading Culture) कमी होत चालली आहे. नवीन पिढीला पुन्हा ग्रंथालये व वाचनाकडे नेण्यासाठी ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. विदेशातील ग्रंथालये व देशातील मोठ्या शहरातील ग्रंथालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) वापर सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील ग्रंथपालांनी आधुनिक तंत्रज्ञान आपल्या ग्रंथालयांत आणावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे प्राचार्य अंकुश दराडे (Ankush Darade) यांनी केले.
अवश्य वाचा : ‘धनंजय मुंडे गुन्हेगार नाही,मी त्यांच्या पाठीशी’-नामदेव शास्त्री
प्राचार्य दराडे यांच्या हस्ते या वर्गाचे उद्घाटन
सावेडीतील महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये दि अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघ अहिल्यानगर व महाराष्ट्र शासनातर्फे शासकीय ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग सुरू करण्यात आला आहे. या वर्गाचे उद्घाटन प्राचार्य दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे निरीक्षक तथा प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रामदास शिंदे, दि अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघाचे संस्थापक सदाशिव शेळके, अध्यक्ष सुरेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. युवराज पोटे आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : मंत्र्यांना व त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
वाचन संस्कृती वाढीस लावण्याबाबतचे मार्गदर्शन (Ankush Darade)
या प्रसंगी सदाशिव शेळके यांनी दि अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वाटचालीची माहिती दिली. तसेच ग्रंथपालांनी वाचन संस्कृती वाढीस लावण्याबाबतचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी ॲड. आजिनाथ जायभाय, नामदेव गरड, विष्णू पवार, भाऊसाहेब गवळी, जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल इथापे, पारसनाथ आहेर, सुखदेव मोहिते, संभाजी पवार, बाळासाहेब शेलार, शशिकांत झंजाड, दीपक आगळे, नवनाथ म्हस्के, तुषार गायकर, ग्यानदेव अनारसे, विकास बांगर, राजेंद्र तरटे, महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.